Iodine deficiency | आपल्या शरीरात जर मिठाची पातळी गरजेपेक्षा कमी झाली, तर आयोडीनची (Iodine deficiency) पातळी देखील कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरात थायरॉईड हा हार्मोन तयार होतो. थायरॉईड हा चयापचय, वाढ तसेच इतर करत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जर शरीरात आयोडीनची कमतरता असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत जनजागृती केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोडीनची कमतरता असल्यामुळे जगभरात मानसिक आणि शारीरिक अपंगत्व येऊ शकते. आणि आयोडीनची (Iodine deficiency) कमतरता हेच अपंगत्वाचे एक मोठे कारण आहे. त्यामुळे आयोडीनची कमतरता असणे ही एक मोठी समस्या मानली जाते. जगभरातील जवळपास दोन अब्ज लोक आयोडीनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. खास करून स्त्रियांमध्ये आणि मुलांमध्ये आयोडीनचा धोका जास्त असतो.
आयोडीनच्या कमतरतेची लक्षणे | Iodine deficiency
- मानेमध्ये गोइटर
- थकवा आणि अशक्तपणा
- वजन वाढणे
- केस गळणे
- कोरडी त्वचा
- एकाग्रता आणि स्मरणशक्तीचा अभाव
- मंद वाढ आणि विकास
- आयोडीनच्या कमतरतेमुळे
आयोडीनच्या कमतरतेची कारणे | Iodine deficiency
आयोडीनची कमतरता प्रामुख्याने आयोडीनयुक्त अन्नपदार्थांमुळे होते. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना त्यांचे आरोग्य तसेच त्यांच्या बाळाच्या विकासासाठी इतरांपेक्षा जास्त आयोडीनची आवश्यकता असते. जर ते पुरेसे आयोडीन युक्त अन्न घेत नाहीत. त्यामुळे या महिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेचा धोका जास्त असतो.
आयोडीनच्या कमतरतेवर उपचार
हे प्रामुख्याने त्याच्या उपचारांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. बहुतेक प्रकरणांमध्ये हे अधिक आयोडीनयुक्त पदार्थ खाऊन किंवा आयोडीन सप्लिमेंट्स वापरून सहज सुधारता येते. गंभीर प्रकरणांमध्ये, डॉक्टर थायरॉईड कार्य वाढवण्यासाठी थायरॉईड हार्मोन्स लिहून देऊ शकतात.