iPhone 16 ची बातच न्यारी!! खरेदीसाठी दुकानाबाहेर ग्राहकांची झुंबड (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone बद्दल भारतीयांना मोठं कुतुहूल आहे. प्रत्येकालाच वाटत कि आपल्याकडेही एखादा आयफोन असावा. भारतात आयफोनची क्रेझ किती मोठी आहे हे आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. iPhone 16 सीरीज आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होताच मुंबईतील आयफोन स्टोअरबाहेर ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. ग्राहक अक्षरशः पळत पळत स्टोअरकडे जात असल्याचे दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो ॲपल बीकेसी – मुंबईचा आहे. सकाळी सातच्या सुमारास ॲपल स्टोअरसमोर मोठी गर्दी दिसून आली. एवढी गर्दी होती की चेंगराचेंगरी झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळावी लागली. यावरून भारतात iPhone 16 ची किती क्रेझ आहे हे स्पष्ट होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

काय आहेत iPhone 16 चे फीचर्स

आयफोन 16 हा एरोस्पेस ग्रेड अल्युमिनियम डिझाईन सह उपलब्ध होणार आहे. हा फोन पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या मोबाईलला काचेच्या सिरॅमिक सील्सह चांगले संरक्षण देण्यात आले आहे. तसेच आयफोन 16 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच आयफोन 16 प्लस मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. ॲपलच्या इन हाऊसचा कोर्स सीपीयू आणि पाच कॉल जीपीयूसी तीन एमए तसेच एप्पल इंटेलिजन्स यांसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. तसेच गेमिंगसाठी चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडिओसाठी देखील फायदा होणार.

या फोनच्या नवीन कॅमेरा कंट्रोल बटनामुळे आता फोटो क्लिक करणे खूप सोपे झालेले आहे. हे एक बटन क्लिक केल्यावर ती कॅमेरा उघडते आणि जास्त वेळ टॅप केल्यावर थेट व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला जातो. या फिचरमध्ये तुम्हाला झूम यांसारखे पर्याय देखील आहे. युजर्सला या बटनासह लाईट प्रेस आणि क्लीन दोन्ही पर्याय मिळणार आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 18 मेगापिक्सल सह फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल सह अल्ट्रावाईड लेन्स सहज 18 मेगापिक्सल फ्युजन कॅमेरा मिळणार आहे. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते.