आयफोन आता सामन्यांच्या आवाक्यात, माफक किंमतीत iPhone 9 होणार भारतात लाँच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। जगप्रसिद्ध कंपनी ऍपल आपल्या मोबाईल बनवण्याच्या वैशिष्टगुणांमुळे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. मात्र त्यांच्या मोबाईल फोन च्या किमती ह्या आवाक्याबाहेच्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते खरेदी करण्यासाठी नाराजी दर्शवतात. मात्र आता ऍपल ने हिची बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर आणली आहे. ऍपल कंपनी लवकरच भारतामध्ये सर्वात स्वस्त आयफोन लाँच करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समोर आले आहे.

iPhone 9 असं या फोन चे नाव असून 2020 मध्ये जानेवारी ते मार्चच्या दरम्यान हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत 399 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 28 हजार रुपये असणार आहे. सर्वात स्वस्त फोन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक हा फोन खरेदी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन आयफोन 8 प्रमाणे 4.7 इंचाचा LCD डिस्प्ले, Touch ID ने होम बटन iPhone 9 ला दिले आहे. तसेच iPhone 9 फोनला 3GB रॅम दिलेली आहे. यासोबत फोनमध्ये इंटरनल स्टोअरेजचे दोन व्हेरिअंट 64GB आणि 128GB चे असतील. दरम्यान या वर्षी पासून अॅपल कंपनीने आपले मोबाईल फोन भारतामध्ये बनवण्याचे सुरु केले होते. त्यामुळे काही प्रमाणात फोन च्या किमती कमी झाल्या होत्या. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता कंपनीच्या या निर्णयामुळे आयफोन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment