हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL ही फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील एक लोकप्रिय स्पर्धा आहे. IPL मुळे नवोदित क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना संधी मिळते. आतपर्यंत IPL मधील अनेक सामने रंगतदार झाले आहेत. IPL चे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तान मध्येदेखील PSL चे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. या स्पर्धेत देखील अनेक प्रतिभावंत खेळाडूचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी वसीम अक्रम म्हणाला होता की PSL मधील गोलंदाजीचा दर्जा हा IPL पेक्षा चांगला आहे, पण आता मात्र IPL स्पर्धा ही पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेपेक्षाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्पर्धा असल्याची स्पष्ट कबुली अक्रमने दिली आहे.
IPL आणि PSLमध्ये खूप फरक आहे. IPLमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जातो. एका संघाचं बजेट ६० ते ८० कोटी इतकं असतं. म्हणजे PSLच्या दुप्पट. त्यामुळे त्यातून होणारा नफादेखील जास्त असतो. तोच आर्थिक नफा BCCI देशांतर्गत स्पर्धांसाठी वापरते. म्हणूनच IPL ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे”, असे वसीम अक्रम म्हणाला.
IPLमधील खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंचे वैयक्तिक स्तरावर प्रशिक्षक असतात. खेळाडू अशा माजी क्रिकेटपटूंची निवड प्रशिक्षक म्हणून करतात ज्यांनी आधी त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळेच IPLमध्ये खेळताना खेळाडूंचा उत्साह आणि आत्मविश्वास दुप्पट असतो”, असेही अक्रम म्हणाला.