हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
मात्र काही खेळाडूंसाठी युएइमध्ये होणारा आयपीएलचा हा हंगाम अखेरचा असू शकतो. आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील हे खेळाडूही निवृत्ती घेऊ शकतात.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ IPLमधला सगळ्यात यशस्वी संघ आहे. मात्र धोनी सध्या 38 वर्षांचा असून यावर्षी आयपीएल खेळून निवृत्ती घेऊ शकतो.धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले 8 महिने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं यावर्षात धोनी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 190 सामने खेळले आहेत. यात त्यानं 23 अर्धशतकांसह 4432 धावा केल्या आहेत.
आयपीएलचा रनमशीन म्हणून रैनाची विशेष ओळख आहे. मात्र रैनाने 2018नंतर एकही एकदिवसीय आणि 2015नंतर कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळं रैनाही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो.आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणजे सुरेश रैना. त्यानं आयपीएलमध्ये तब्बल 193 सामने खेळले आहेत. यात 38 अर्धशतकासह 5368 धावा केल्या आहेत
हरभजन सिंगही आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या हरभजन सध्या चेन्नई संघात आहे. 2019मध्ये त्यानं 11 सामन्यात 16 विकेट घेतल्या. मात्र हरभजनने स्वत:च आयपीएलनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.
चेन्नईला अनेकदा एकहाती सामने जिंकून देणारा फलंदाज म्हणजे शेन वॉटसन. वॉटसनने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉटसनही 38 वर्षांचा असल्यामुळं आयपीएलमधून तो निवृत्ती घेऊ शकतो2019मध्ये वॉटसनने 17 सामन्यात 398 धावा केल्या आहेत. यात त्यानं अखेरच्या सामन्यात 59 चेंडूत 80 धावांची तुफानी खेळी केली होती.