हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या या तेराव्या हंगामात आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. आता प्ले ऑफसाठी पहिल्या चार संघांमध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार चुरस होऊ शकते. प्ले ऑफसाठी पात्र होण्याकरिता संघांना 16 गुण मिळवणे बंधनकारक आहे.आत्तापर्यंत सर्व संघाचे 6 सामने झाले असून यानुसार कोणते चार संघ प्ले ऑफसाठी पात्र होणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास तीन संघ या शर्यतीतून बाहेर पडल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
आयपीएल गुणतालिकेत सध्या 10 गुणांसह दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर 8 गुणांसह मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दिल्ली आणि मुंबई यांच्यात सामना होणार आहे. अव्वल स्थान पटकावण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरस पाहता येईल. पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर बंगळुरूनं चेन्नईला नमवत चौथे स्थान मिळवले आहे. कोलकाता आणि बंगळुरू यांचे गुण समान असले तरी, बंगळुरूचा नेट रन रेट माइन्समध्ये आहे. त्यामुळे हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र होऊ शकतात.
A look at the Points Table after Match 25 of #Dream11IPL pic.twitter.com/LQHEuuPTY4
— IndianPremierLeague (@IPL) October 10, 2020
सनरायझर्स हैदराबादनं 6 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. तर, गुणतालिकेत पंजाबचा संघ अंतिम स्थानी आहे. त्यांनी 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे पंजाबचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे.राजस्थान आणि चेन्नईची अवस्था सुद्धा अशी असून राजस्थान आणि चेन्नई यांना आता सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’