सलग चार विजयानंतरसुद्धा धोनी करणार संघात ‘हा’ मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची चेन्नई सुपर किंग्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद विजयासाठी झगडताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानी आहे. धोनीने सलग चार सामने जिंकले आहेत. तरीपण धोनी आपल्या टीममध्ये मोठा बदल करणार आहे. सहसा कोणता कर्णधार सलग ४ सामने जिंकणाऱ्या टीममध्ये बदल करत नाही. पण धोनीची विचारक्षमता थोडी वेगळी असते. चला तर मग पाहूया आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काय बदल होणार ?

चेन्नई सुपर किंग्स
आजच्या सामन्यात धोनी अंबाती रायडूच्या जागी रॉबिन उथप्पाला संधी देऊ शकतो. मोईन अली फिट झाला तर ब्राव्होच्या जागी तो संघात असेल नाहीतर ब्राव्होलाच संघात ठेवले जाईल. दिल्लीच्या खेळपट्टीचा विचार करता धोनी ब्राव्होला संधी देण्याची अधिक शक्यता आहे. इमरान ताहीरला आणखी एक संधी मिळू शकते.

सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर विदेशी खेळाडूंमध्ये कोणताही बदल करणार नाही. विराट सिंहच्या जागी मनीष पांडेला संधी दिली जाऊ शकते. केदार जाधवला या सामन्यात देखील संधी दिली जाऊ शकते. अब्दुल समद हा एक उत्तम फिनिशर असल्याने त्याला देखील संघात स्थान दिले जाऊ शकते. भुवनेश्वर कुमार फिट आहे का कि नाही यावर त्याचे स्थान ठरवले जाऊ शकते.

संभाव्य संघ खालीलप्रमाणे
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, ब्राव्हो, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम करन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर

सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, जगदीश सुचित, खलिल अहमद, सिद्धार्थ कौल

Leave a Comment