आरसीबीविरुद्ध धोनीने जडेजावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या आयपीएलचे सामने रंगतदार होत आहेत. या हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सलग ४ सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम पहिल्या नंबरवर आहे तर चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या नंबरवर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत आहे त्यामुळे बंगलोरच्या संघांची ताकद वाढली आहे. ग्लेन मॅक्सवेलला लवकरात लवकर बाद करणे हे धोनीसमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण ग्लेन मॅक्सवेल सध्या खूप फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे धोनीने आपली रणनीती तयार करून रवींद्र जडेजावर मोठा जबाबदारी देणार आहे. आजच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ एकमेकांना भिडणार आहेत.

मॅक्सवेलला अडवणार रवींद्र जडेजा
ग्लेन मॅक्सवेलला खिळवून ठेवण्यासाठी धोनी आपले प्रमुख अस्त्र जडेजाचा वापर करणार आहे. कारण जडेजाची मॅक्सवेल विरोधातील आकडेवारी चांगली आहे. जडेजा हा आपल्या फिरकीच्या जोरावर आरसीबीसाठी घातक गोलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत ११ टी-२० सामन्यांमध्ये जडेजा आणि मॅक्सवेल एकमेकांसमोर आले आहेत त्यामध्ये जडेजाने ५ वेळा मॅक्सवेलला आउट केले आहे. यामुळे धोनी मॅक्सवेलविरुद्ध जडेजाचा कशा प्रकारे वापर करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी मॅक्सवेल लवकर आऊट होणे गरजेचे आहे
ग्लेन मॅक्सवेलच्या आतापर्यंतच्या आकडेवारीवर लक्ष टाकले असता त्याची विकेट चेन्नईसाठी किती महत्वाची आहे हे लक्षात येईल. ग्लेन मॅक्सवेलनने मागच्या ४ सामन्यात २ वेळा अर्धशतक केले आहेत. तर त्याचा स्ट्राइक रेट १५० एवढा आहे. मॅक्सवेल हा आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे आता रवींद्र जडेजा ग्लेन मॅक्सवेलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment