हरलेली बाजी पलटवणारी मुंबई इंडिअन्स ; अखेरच्या क्षणी हैदराबादवर रोमहर्षक विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. मुंबईचे गोलंदाज या सामन्यात पुन्हा एकदा हिरो ठरले. दरम्यान हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला.

मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने पावरप्ले पर्यंत चांगली सुरुवात केली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना अपयश  मिळालं. 137 वर सर्व संघ आऊट झाल्यानं पुन्हा एकदा हाती निराशाच पदरात पडली.

हैदराबाद कडून डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टा यांनी आक्रमक सलामी दिल्यानंतर देखील त्यांची मिडल ऑर्डर अक्षरशः कोलमडली. मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी केलेला टिच्चून मारा निर्यायक ठरला.

तत्पूर्वी सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि आक्रमक फलंदाज कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजी मुळे मुंबईने कसा तरी 150 धावा बनवल्या होत्या. डी कॉकने 40 धावा केल्या तर पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like