IPL 2023 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार IPL चा थरार; पहिल्याच सामन्यात भिडणार ‘हे’ 2 चॅम्पियन संघ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट (IPL 2023) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार असून 21 मे ला अंतिम सामना होणार आहे. आयपीएल 2023 चा सलामीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघात पहिला सामना होणार आहे.

चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्यामुळे महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पंड्या ही गुरु शिष्याची जोडी एकमेकांसमोर उभी ठाकलेली दिसणार आहे. यावेळीही आयपीएलमध्ये (IPL 2023) 10 संघ सहभागी होत आहेत. साखळी फेरीत 70 सामने खेळवण्यात येतील. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते की, यावेळची आयपीएल जुन्या फॉरमॅटवर होईल, म्हणजेच प्रत्येक संघ अर्धे सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळेल तर अर्धे सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळावे लागतील.

संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे – (IPL 2023)

अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे तर चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश ब गटात करण्यात आला आहे.

IPL 2023 चे सामने पुढील शहरात खेळवण्यात येतील.

अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला.