IPL 2024 Awards : नारायण ते कोहली .. कोणत्या खेळाडूला कोणता अवॉर्ड मिळाला? पहा Full List

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर आयपीएल 2024 ची सांगता झाली. श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सुरुवातीला २ बळी घेत हैद्राबादला बॅकफूटवर ढकलणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून गोलंदाजांवर तुटून पडणारा आणि घातक फिरकीने फलंदाजांना बांधून ठेवणारा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला प्लेयर ऑफ द टूर्नामेन्ट पुरस्कार जाहीर (IPL 2024 Awards) करण्यात आला. याशिवाय यंदाच्या आयपीएल मध्ये आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकणाऱ्या इतर खेळाडूंनाही अनेक पुरस्कार मिळाले. आयपीएल 2024 च्या पुरस्कार यादीवर एक नजर टाकूया-

कोणाला कोणता अवॉर्ड मिळाला – IPL 2024 Awards

विजेता संघ – कोलकाता नाईट रायडर्स- 20 कोटी रुपये
उपविजेते – सनरायझर्स हैदराबाद- 12.5 कोटी रुपये
फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन- सुनील नरेन – 10 लाख
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन- नितीश रेड्डी- 10 लाख
सर्वोत्तम स्ट्राइक रेट- जेक फ्रेझर-मॅकगर्क- 10 लाख
कॅच ऑफ द सीझन- रमणदीप सिंग,- 10 लाख
सर्वाधिक चौकार – ट्रेव्हिस हेड – 10 लाख
सार्वधिक षटकार – अभिषेक शर्मा – 10 लाख
फेअर प्ले अवॉर्ड- सनरायझर्स हैदराबाद- 10 लाख
पर्पल कॅप – हर्षल पटेल-10 लाख
ऑरेंज कॅप – विराट कोहली- 10 लाख
खेळपट्टी आणि मैदानी पारितोषिक – हैदराबाद, -50 लाख रुपये.

दरम्यान, कालच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी कोलकात्यासमोर सफशेल नांगी टाकली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अवघ्या ६ धावांतच तंबूत परतल्याने सुरुवातीला हैद्राबादचा संघ बॅकफूटवर गेला. २० षटकात हैदराबादला अवघ्या ११३ धावाच करता आल्या. केकेआरने हे आव्हान अवघ्या १० षटकात गाठलं. रहमतुल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या तर व्यंकटेश अय्यरने २६ चेंडूत ५२ धावा केल्या. या विजयाने कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान (IPL 2024 Awards) पटकावला.