हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर IPL 2024 मध्ये प्ले ऑफ मध्ये (IPL 2024 Playoffs) जाणाऱ्या ४ संघाची नावे जाहीर झाली आहेत. पॉईंट टेबल नुसार, पहिल्या स्थ्यानी कोलकाता नाईट रायडर्स, दुसऱ्या क्रमांकावर सनरायजर्स हैद्राबाद, तिसर्या स्थानी राजस्थान रॉयल्स आणि चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ आहे. त्यामुळे क्वालिफायर १ चा सामना कोलकाता नाईट रायडर्स, विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद असा असणार आहे तर रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना होईल. क्वालिफायर १ मध्ये जो पराभूत होईल आणि एलिमिनेटर मध्ये जो विजयी होईल त्यांच्यात क्वालिफायर २ चा सामना होईल.
असे असतील सामने – IPL 2024 Playoffs
क्वालिफायर १ – कोलकाता नाईट रायडर्स, विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद
स्थळ – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
तारीख – २१ मे २०२४
वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
एलिमिनेटर – रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
स्थळ – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
तारीख – २२ मे २०२४
वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
क्वालिफायर २– एलिमिनेटर मधील विजेता संघ विरुद्ध क्वालिफायर १ मधील पराभूत झालेला संघ
स्थळ – चेपॉक स्टेडियम चेन्नई
तारीख – २४ मे २०२४
वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
अंतिम सामना – क्वालिफायर १ मधील विजेता विरुद्ध क्वालिफायर २ मधील विजेता संघ
स्थळ – चेपॉक स्टेडियम चेन्नई
तारीख – २६ मे २०२४
वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
दरम्यान, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायजर्स हैद्राबाद यांनी आत्तापर्यंत किमान एकदा तरी आयपीएल जिंकली आहे. मात्र रॉयल चॅलेन्जर बंगळुरू अजूनही एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सांघिक खेळाच्या जोरावर आरसीबीने प्ले ऑफ (IPL 2024 Playoffs ) मध्ये धडक मारली आहे. विराट कोहली, फाफ डुप्लेसिस. कॅमेरून ग्रीन, आजच्या पाटीदार यांसारखे खेळाडू तुफान फॉर्मात असल्याने यंदा तरी आयपीएल जिंकावी अशी आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा असेल.