यंदाच्या आयपीएल लिलावात दिनेश कार्तिकची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बँगलोर : वृत्तसंस्था – आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिकची आयपीएलच्या पहिल्या सिझनपासूनची इच्छा पुन्हा एकदा अपूर्ण राहिली आहे. दिनेश कार्तिक हा मूळचा चेन्नईचा आहे. त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायला मिळावे अशी त्याची इच्छा होती. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये दिनेश कार्तिकची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने जोरदार प्रयत्न केले. पण, अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सवर मात करत कार्तिकला 5 कोटी 50 लाखांना विकत घेतले.

आयपीएलच्या मागच्या सीझनपर्यंत दिनेश कार्तिक कोलकात्याच्या टीमसोबत होता, पण लिलावाआधी केकेआरने कार्तिकला रिलीज केले. दिनेश कार्तिक आयपीएल 2020 पर्यंत केकेआरचा कर्णधार होता, पण अर्धी आयपीएल संपल्यानंतर केकेआरने अचानक त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले. यानंतर केकेआरचे कर्णधारपद इंग्लंडच्या इयन मॉर्गनकडे सोपवण्यात आले. दिनेश कार्तिक त्याचा मित्र आणि मार्गदर्शक अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये आयपीएलची तयारी करत आहे.

दिनेश कार्तिकची कारकीर्द
दिनेश कार्तिक हा 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा भाग होता. टी-20 मध्ये फिनिशरची भूमिका निभावण्यासाठी आपण खेळामध्ये थोडी सुधारणा करत आहोत, तसंच पुढची 4 वर्ष आपल्याला खेळायचं असल्याचे मत दिनेश कार्तिकने यावेळी व्यक्त केले. कार्तिकने आतापर्यंत 6 टीमकडून आयपीएल खेळली आहे. मात्र त्याचे शहर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात त्याची हि इच्छा पूर्ण होईल असे वाटले होते पण ती इच्छा अपूर्णच राहिली.

Leave a Comment