IPL Auction 2026 : बाब्बो!! तब्बल 25.20 कोटींची खरेदी; कॅमेरॉन ग्रीन ठरला सर्वात महागडा खेळाडू

IPL Auction 2026
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL Auction 2026 । आयपीएल 2026 च्या लिलावात आज ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑल राऊंडर कॅमेरॉन ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल ₹२५.२० कोटी रुपयांत खरेदी केलं. कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलं आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच मिचेल स्टार्कच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ग्रीनने स्टार्कचा हा रेकॉर्ड आता मोडीत काढला आहे. कोलकात्याने या स्टार अष्टपैलू खेळाडूवर अचूक डाव टाकला आहे.

ग्रीन केकेआरचा संघ मजबूत – IPL Auction 2026

कॅमेरॉन ग्रीन हा यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू या २ संघाकडून आयपीएल खेळला आहे. आता तो कोलकात्याच्या ताफ्यात खेळताना दिसेल. ग्रीनला संघात घेण्यासाठी कोलकाता आणि बंगलुरू मध्ये चढाओढ पाहायला मिळत होती. अखेर केकेआरने बाजी मारली आणि तब्बल २५.२० कोटींमध्ये त्याला संघात सामील करून घेतलं. कॅमेरॉन ग्रीन कोलकात्याच्या संघाला नक्कीच मजबुती आली आहे. IPL Auction 2026

कॅमेरॉन ग्रीनला भलेही कोलकाताने ₹२५.२० कोटी रुपयांत खरेदी केलं असलं तरी त्याच्या खात्यात फक्त ₹१८ कोटीजमा होतील. उर्वरित ₹७२ दशलक्ष (७२ दशलक्ष रुपये) बीसीसीआयकडे जातील. बीसीसीआयच्या ‘कमाल शुल्क’ नियमामुळे ग्रीनला कोट्यवधींचे नुकसान होईल. नियमानुसार, लिलावात परदेशी खेळाडूसाठी जास्तीत जास्त किंमत ही सर्वोच्च रिटेन्शन स्लॅब (₹१८ कोटी) मधील सर्वात कमी आणि मागील मेगा लिलावात सर्वात महागड्या खेळाडूची किंमत असते,

दरम्यान, आजच्या लिलावात पृथ्वी शॉ, जॉनी बेअरस्टो, गुरबाज, राहुल चाहर, गेराइल्ड कोएतझी हे खेळाडू अनसोल्ड राहिले. श्रीलंकेचा स्टार गोलंदाज आणि देठ ओव्हर स्पेशालिस्ट महिषा पाथीरानाला सुद्धा कोलकाता नाईट रायडर्सने १८ कोटींमध्ये खरेदी केलं. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएल लिलावासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 237.55 कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे. मिनी ऑक्शनमध्ये कमाल 77 खेळाडू खरेदी करता येणार असून, एकूण 359 खेळाडू लिलावात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त 31 परदेशी खेळाडूंनाच करार मिळू शकतो, तर लिलावात 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.