मुंबई इंडिअन्स कडून नव्या जर्सीचं अनावरण; पहा कशी दिसणार रोहितची पलटण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ची लवकरच सुरुवात होणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आयपीएलचा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी संघ ठरलेला मुंबई इंडिअन्स च्या संघाने आपल्या नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. मुंबई इंडिअन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ही माहिती आहे. निळा आणि सोनेरी छटा असलेली ही जर्सी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. येवडच नव्हे तर मुंबईने आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने प्रत्येक मोसमात प्रभावी कामगिरी केली आहे. यावेळी मुंबई कशी सुरू होते, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

मुंबईच्या संघात रोहित शर्मा, क्रुणाल पंड्या, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत. यंदाचा आयपीएल हंगाम 9 एप्रिल ते 30 मे अशा कालावधीत रंगणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like