आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का ; ‘हा’ महत्वाचा खेळाडू मुकण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी 4 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सची टीम युएईला रवाना झाली आहे. पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच मुंबईच्या टीमला जबरदस्त धक्का बसला आहे. मुंबईसाठी महत्त्वाचा असलेला ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा सुरुवातीच्या काही मॅचना मुकणार आहे. वैयक्तिक कारणामुळे मलिंगा आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅच खेळू शकणार नाही.

लसिथ मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही आठवड्यांमध्ये शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलिंगा वडिलांसोबत असणार आहे. परंतु मुंबई साठी दिलासादायक गोष्ट म्हणजे मलिंगा शेवटच्या काही मॅच आणि प्ले ऑफसाठी मुंबईच्या टीममध्ये येईल.

लसीथ मलिंगा मुंबई साठी नेहमीच हुकमी एक्का ठरला आहे.मागच्या वर्षी मुंबईने चौथ्यांदा आयपीएलवर आपलं नाव कोरलं होत. चेन्नईविरुद्धच्या फायनलमध्ये मलिंगाने शेवटच्या ओव्हरला ८ रन रोखल्या. पहिल्या तीन शेवटच्या बॉलवर चेन्नईला विजयासाठी २ रनची गरज असताना मलिंगाने शार्दुल ठाकूरला एलबीडब्ल्यू करून मुंबईला चौथ्यांदा आयपीएल जिंकवून दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’