हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL Tickets GST। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलने बुधवारी देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत काही मोठे बदल मंजूर केले. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५% आणि १८% असे दोनच स्लॅब टॅक्स असतील. या बदलामुळे औषधे, कृषी उपकरणे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहेत. परंतु दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना मात्र केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. कारण देशातील आघाडीची क्रिकेट लीग असलेल्या IPL च्या तिकिटावर मात्र तब्बल ४० टक्के टॅक्स आकारण्यात आला आहे. त्यामुळे स्टेडियम मध्ये जाऊन आयपीएल मॅच बघणं आता परवडणार नाही.
इंडियन प्रीमियर लीग ज्याला आपण आयपीएल म्हणतो, ही स्पर्धा म्हणजे देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या भारतात तर क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानले जाते आणि आयपीएल स्पर्धेत तर देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी थेट स्टेडियम मध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटतात. भारतात आयपीएलची आणि आयपीएल बघणाऱ्या क्रिकेट प्रेमींची एक वेगळीच हवा असते. मात्र आता याच क्रिकेटप्रेमींना केंद्र सरकारने जोर का धक्का दिला आहे. यापूर्वी आयपीएलच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी (IPL Tickets GST) आकारला जात होता मात्र आता जीएसटी 40% वर नेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे .
का वाढवला आयपीएल तिकिटांवरील टॅक्स ? IPL Tickets GST
सरकारने आयपीएल आणि तत्सम उच्च-मूल्य असलेल्या क्रीडा स्पर्धांना ‘अनावश्यक आणि लक्झरी श्रेणी’मध्ये ठेवले आहे. म्हणून, त्यांना कॅसिनो, रेस क्लब आणि लक्झरी वस्तूंसारख्याच कर स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे. IPL Tickets GST
तुमचं तिकीट किती रुपयांनी वाढणार ?
उदाहरण द्यायचं झालं तर समजा, तुम्ही 1000 रुपयाचे तिकीट घेतलं तर त्यावर आधी 28 टक्के जीएसटीनुसार १२८० रुपये द्यावे लागायचे. मात्र आता हाच टॅक्स 40% झाल्याने तुमच्या खिशातून १४०० रुपये जातील. जर तुम्ही २००० रुपयांचे तिकीट घेतले तर 40% टॅक्स नुसार तुम्हाला 2,800 रुपये भरावे लागतील…. परंतु ही नवीन टॅक्स सिस्टीम फक्त आयपीएल सामन्यांसाठीच आहे, भारतीय क्रिकेट संघाचा एखादा आंतरराष्ट्रीय सामना असेल तर त्या तिकिटांवर आधीप्रमाणेच 18% जीएसटी असेल.




