पहा IPL चा नवीन लोगो ; चाहत्यांना विचारलं कसा वाटतोय लोगो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर अनेक अडथळे पार करत इंडियन प्रीमियर लीग  येत्या १९ सप्टेंबर पासून UAE मध्ये सुरू होत आहे. करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात होणारी ही स्पर्धा लांबणीवर पडली आहे. अखेर आता आयपीएलला सुरुवात होणार आहे.

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने चिनी कंपनी विवोचे प्रायोजकत्व काढून घेतले. त्यानंतर बीसीसीआयने नवा प्रायोजकाचा शोध सुरू केला.या वर्षी आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी टाटा सन्स, अनअकॅडमी आणि बायजू सारख्या कंपन्या स्पर्धेत होत्या. पण ड्रीम ११ने २२२ कोटी मोजत स्पॉन्सरशिप मिळवली. या घोषणेनंतर आयपीएलने आपल्या अधिकृत इस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत नवा लोगो प्रसिद्ध केले.new 1

आयपीएलने इस्टाग्रामवर शेअर केलेल्या या स्टोरीत नवा लोगो शेअर करून विचारले आहे की, आमचा नवा लोगो कसा वाटतोय? या सोबत त्यांनी #Dream11IPL असा हॅशटॅग वापरलाय. ड्रीम ११ कडे ३१ डिसेंबरपर्यंत आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशिपचे अधिकार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’