हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक गुतंवणूकदार बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतो. जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या IPO (Initial Public Offering) मध्ये नेहमी गुंतवणूक करण्याची सवय असेल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) लवकरच SME IPOs (Small and Medium Enterprises IPOs) मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देणार असून, ज्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
SME IPO मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढणार
SEBI ने SME IPO साठी कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या प्रस्तावात ही रक्कम 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये फक्त जोखीम घेण्याची क्षमता आणि पुरेसे ज्ञान असलेल्या गुंतवणूकदारांनीच SME IPO मध्ये गुंतवणूक करावी, हा त्याचा मुख्य उद्देश आहे . SEBI च्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीची रक्कम वाढवल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी कमी होईल आणि जास्त अनुभव असलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल. हे केल्यामुळे SME विभागाचा आत्मविश्वास वाढून गुंतवणूकदारांसाठी जास्त सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
SEBI चा निर्णय
अनेक वर्षांपासून SME IPO मध्ये गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढताना दिसत आहे. पण या IPOs मध्ये जोखीम जास्त असते . तसेच शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर बाजारभावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत गुंतवणूकदार अडचणीत येऊ शकतात. हे टाळण्यासाठी आणि SME IPO गुंतवणुकीला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी SEBI हा निर्णय घेतलेला आहे.
4 डिसेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव
SEBI ने या प्रस्तावांवर लोकांकडून 4 डिसेंबर 2024 पर्यंत सूचना मागवल्या आहेत. यानंतर प्रस्ताव लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. SEBI चा हा प्रस्ताव SME क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महत्वाचा ठरेल. गुंतवणूकदारांनी सावधगिरीने आणि योग्य माहितीच्या आधारावर गुंतवणूक करण्याची गरज आहे. यामुळे SME कंपन्यांमध्ये प्रामाणिक आणि स्थिर गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या बदलाकडे दुर्लक्ष करू नका .