हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फार पूर्वी मुलींचे लग्न खूप कमी वयातच केले जायचे. परंतु मुलींची मानसिक आणि शारीरिक वाढ या सगळ्याचा विचार करून भारतामध्ये त्याचप्रमाणे इतर अनेक देशांमध्ये देखील मुलींचे लग्नाचे कमीत कमी वय हे 18 वर्षे झालेले आहे. कारण या वयात मुली सज्ञान होतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी 18 वर्षानंतरच लग्न केले जाते. यामुळे मुलींना शिक्षण देखील घेता येते आणि स्वतःच्या पायावर उभे देखील राहता येते. परंतु अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका मुस्लिम देशात मुलींचे लग्नासाठी 9 वर्ष करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. आणि संसदेत याबद्दलचे विधायक देखील मांडण्यात आलेले आहेत. आता हा देश कोणता आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
इराकमध्ये संसदेमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. यावेळी मुलींचे लग्नाचे वय हे कमीत कमी 9 वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि या विधेयकावरून संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात वाद देखील निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याबाबत जनता व्यक्त केली जात आहे.
सध्या इराक मध्ये देखील मुलींच्या लग्नाचे वय हे 18 वर्षे आहे. परंतु संसदेत याबद्दलचे विधेयक जर मंजूर झाले, तर मुलींच्या लग्नाचे व्य हे 9 वर्ष होईल आणि त्यावेळी त्या मुलीला जवळपास 15 वर्षाच्या मुलासोबत विवाह करावा लागेल. आणि त्यामुळे या देशामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक संघटनांनी या विधेयकाला विरोध केलेला आहे. जर असे केले तर महिलांचे अधिकार आणि लैंगिकता नष्ट होईल. त्यामुळे हे विधेयक संसदेत मंजूर केली जाऊ नये. अशी देखील मागणी केलेली आहे. तसेच महिलांची प्रगती देखील थांबणार आहे. मानवी हक्क संघटना सामाजिक संघटना आणि इतर महिला संघटनांनी देखील या विधेयकाला कडाडून विरोध केलेला आहे. जर या विधेयकाची मंजुरी झाली तर मुली तरुण मुलींचे शिक्षण त्यांच्या आरोग्य आणि कल्याणावर निर्बंध येतील. बालविवाहामुळे त्यांना शाळा सोडावी लागेल. त्याचप्रमाणे अगदी कमी वयात होणारी गर्भधारणा घरगुती हिंसाचार यांसारखी प्रकरणे वाढण्याचा देखील धोका आहे.