Monday, January 30, 2023

IRCTC ने बदलले ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नियम, त्याविषयी जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि ऑनलाइन रेल्वे तिकीट काढत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आता ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. रेल्वे प्रवाशांना आता मोबाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तिकीट मिळेल.

नवीन रेल्वे नियम
कोरोना संसर्गामुळे दीर्घकाळ तिकीट न काढलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने नवे नियम केले आहेत. अशा लोकांना IRCTC पोर्टलवरून तिकीट खरेदी करण्यासाठी पहिले त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तिकीट मिळेल. मात्र, ज्या प्रवाशांनी नियमित तिकीट काढले आहे त्यांना या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.

- Advertisement -

नियम का बनवले होते ते जाणून घ्या
कोरोनाचा कहर थांबताच रेल्वे रुळावरून धावू लागल्या. अशा स्थितीत तिकिटांची विक्रीही वाढली आहे. IRCTC च्या दिल्ली मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,”कोरोना संसर्गाची पहिली आणि दुसरी लाट आणि त्यापूर्वी पोर्टलवर निष्क्रिय असलेली खाती याची खात्री करण्यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”

व्हेरिफिकेशन कसे करायचे ते जाणून घ्या
तुम्ही IRCTC पोर्टलवर लॉग इन करता तेव्हा व्हेरिफिकेशन विंडो उघडली जाते. त्यावर आधीच रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाईल नंबर टाका. आता डावीकडे एडिट आणि उजवीकडे व्हेरिफिकेशनचा पर्याय आहे. व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडल्यावर, तुमच्या नंबरवर एक OTP (वन टाइम पासवर्ड) मिळेल. OTP टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्याचप्रमाणे ईमेलसाठीही व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. ईमेलवर मिळालेल्या OTP द्वारे याचे व्हेरिफिकेशन केले जाते.

IRCTC द्वारे तिकीट कसे बुक करावे ?
IRCTC रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करा. या पोर्टलवर तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांनी पहिले आयडी पासवर्ड तयार करावा. आयडी तयार करण्यासाठी, प्रवाशाला त्याचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर डिटेल्स द्यावा लागेल. ईमेल आणि नंबरचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच प्रवाशांना तिकीट बुक करता येईल.