IRCTC : राजधानी एक्सप्रेस मध्ये जेवणात आढळले झुरळ ; रेल्वेला मागावी लागली माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC : आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आवर्जून रेल्वेचा वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बहुतांशी जेवणाची सुविधा असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये भारतीय रेल्वे अँड केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी तर्फे ही सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा त्याचा दर्जा हा खालावण्याची अनेक उदाहरणं आपण माध्यमातून पाहत असतो. आता असेच आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई -दिल्ली राजधानी एक्सप्रेस (IRCTC) च्या जेवणात चक्कं झुरळ आढळल्याची माहिती एका प्रवाशाने ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे.

नक्की काय घडले ? (IRCTC)

हा प्रवासी मुंबई हुन दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस मधून प्रवास करीत होता. याचवेळी या प्रवाशाने आपल्या तिकीट बुकिंग सोबत जेवणाचे देखील बुकिंग घेतले होते. मात्र या व्यक्तीला रेल्वेमध्ये जेवणाचे पार्सल मिळाले (IRCTC) त्यामध्ये चक्क झुरळ सापडले. त्यानंतर वैतागून प्रवाशाने याबाबत आपल्या ट्विटर अकाउंट वरून याबाबत रोष व्यक्त केला. त्याने आपल्या X प्लॅटफॉर्म वर फोटो पोस्ट करत म्हंटले आहे की, “काल CSMT #मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करत असताना जेवण तिकिटासोबत बुक केले होते. या जेवणात एक झुरळ तरंगत होता, सोबत फोटो जोडत आहे. तक्रार केल्यानंतर मॅनेजर आले आणि म्हणाले तुम्हाला पैसे परत देतो, तिकिटाचे पैसे ही परत देतो. “

रेल्वे विभागाकडून माफी (IRCTC)

घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागत या प्रवेशाच्या ट्विटला IRCTC कडून उत्तर देण्यात आले असून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. IRCTC ने त्याच्या ट्वीटवर कमेंट केली आहे. ” सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल अत्यंत क्षमस्व. या (IRCTC) घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सेवा पुरवठा दारावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच या स्वयंपाकगृहाची सुविधा तात्पुरती बंद केली गेली आहे,” असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.