IRCTC : भारत म्हणजे संस्कृती आणि परंपरा जपणारा देश …! भारतातील लोक आपल्या धर्मीक श्रद्धेसाठी सुद्धा ओळखले जातात. भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना अनेक लोक दरवर्षी भेटी देतात. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे अनेकजण आपल्या पूर्ण कुटुंबासह धार्मिक ठिकांणांच्या सफारीला निघतात. आज आम्ही तुम्हाला एक खास धार्मिक सफरीबद्दल सांगणार आहोत. भारतीय रेल्वेने (IRCTC) भाविकांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारत गौरव विशेष ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.
या पॅकेज अंतर्गत सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर अशा 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन (IRCTC) घेता येणार आहे.
- भारतीय रेल्वेचा हा दौरा राजस्थानची राजधानी जयपूर येथून सुरू होणार आहे.
- भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 1 जून 2024 रोजी जयपूर येथून 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी सुरू होईल.
- हे पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी असेल. जयपूर रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, प्रवासी अजमेर, भिलवाडा, चित्तोडगड आणि उदयपूर स्थानकांवरून चढू/डिबोर्ड करू शकतील.
कुठे कुठे जाल ?
वेरावळ : सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर
द्वारका: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि द्वारकाधीश मंदिर
पुणे : भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर
नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
औरंगाबाद : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
उज्जैन: महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
काय आहे पॅकेजची किंमत ?
टूर पॅकेजचे दर प्रवाशाने निवडलेल्या पर्यायानुसार असतील. पॅकेज 26,630 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. जर तुम्हाला कॅम्फोर्ट क्लास मधून प्रवास करायचा असेल तर दोघा /तिघांकरिता जागेसाठी प्रति व्यक्ती खर्च २६,६३० रुपये आहे. तर स्टँडर्ड क्लास मध्ये , डबल ट्रिपल सीट करीता प्रति व्यक्ती खर्च 31,500 रुपये येतो.
कसे कराल बुकिंग ?
IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात. पॅकेजशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही 8595930996/ 8595930998/ 8595930997/ 9001094705 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.