हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक लोक एप्रिल-मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचे प्लॅनिंग करून ठेवतात. खास करून अनेक लोक भारतातील धार्मिक ठिकाणे पाहिला जातात. अशाच पर्यटकांसाठी IRCTC ने एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता पर्यटकांना कमीत कमी बजेटमध्ये प्रवास करता यावा म्हणून गुरु कृपा टूर (Guru Krupa Tour) सुरू करण्यात आली आहे.
IRCTC च्या या टूरमध्ये नांदेड साहिब आणि पाटणा साहिब या दोन पवित्र शीख गुरुद्वारांचा समावेश आहे. एकूण सहा दिवस आणि पाच रात्री असलेल्या या यात्रेची सुरुवात मुंबई येथून होणार आहे. या टूरमध्येच प्रवाशांना राहण्याची आणि भोजनाची सुविधा पुरवण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रवास IRCTC द्वारे नियोजित करण्यात आला आहे.
किंमती आणि सुविधा
या धार्मिक यात्रेच्या किमती वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी १३,३५० रुपये इतकी किंमत ठरविण्यात आली आहे. तसेच, अधिक आरामदायी प्रवास हवा असल्यास कम्फर्ट क्लासचे तिकीट २६,४३० रुपये इतके आहे. तसेच, टू-टियर एसी क्लाससाठी ३३,५५० रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, ही यात्रा येत्या १६ मार्चपासून सुरू होणार आहे. गुरु कृपा टूर मध्ये शीख धर्माच्या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे शीख भाविकांसाठी तसेच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यास इच्छिणाऱ्यांसाठी ही टूर फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाचे म्हणजे, या टूरसाठी इच्छुक असणारे प्रवासी IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात. यामध्ये मर्यादित सीट्स उपलब्ध असल्याने शक्य तितक्या लवकर आपल्या सीट बुक कराव्यात. तसेच, संपूर्ण माहिती जाणून घेऊन धार्मिक पर्यटनाचा अनुभव घ्यावा. IRCTC ही आपल्या प्रवाशांची योग्य ती काळजी घेते आणि सर्व सुविधा देखील पुरवते. त्यामुळे अशा टूर पर्यटकांसाठी फायदेशीर ठरतात.