IRCTC : तुम्ही अनेकदा तुमची कार तुमच्या गाड्या ऍटोमॅटिक पद्धतीने साफ करून घेतल्या असतील. मात्र तुम्हाला कधी विचार पडला आहे का ? एवढी भली मोठी ट्रेन कशी बरं साफ केली जात असेल ? अनेक सफाई कर्मचारी मेहनत घेऊन ट्रेन साफ करतात. मात्र आता रेल्वेने सोशल मीडियावर ऍटोमॅटीक ट्रेन वॉशिंग (IRCTC) चा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस ऍटोमॅटिक पद्धतीने वॉश होताना दिसत आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेससह ट्रेन्स स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटमध्ये स्वच्छ केल्याचा हा व्हिडिओ आहे.
व्हिडिओ शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने लिहिले आहे की, स्वच्छतेचे उच्च दर्जाचे पालन, 73 ठिकाणी कोच वॉशिंग प्लांट बसवण्यात आले आहेत, जे पाणी आणि पैशांचा कमीत कमी वापर करतात. या वॉशिंग प्लांट (IRCTC)मध्ये केवळ 15-20 मिनिटांत बाहेरून स्वच्छ केली जाते. मात्र सध्या, अनेक रेल्वे हाताने स्वच्छ केले जात आहेत, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि मेहनत घेणारी आहे आणि भरपूर पाण्याचा देखील यासाठी वापर होतो.
Maintaining high standards of Cleanliness. 🚆🧼 pic.twitter.com/a1pl3yWlh8
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 17, 2024
गेल्या वर्षी शेअर केलेल्या तत्सम व्हिडिओमध्ये, रेल्वेने (IRCTC) दावा केला होता की हे प्लांट “उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह” सुसज्ज आहेत. यामध्ये उच्च-दाब असलेले पाण्याचे जेट्स आणि उभे आडवे असणारे ब्रश यांचा समावेश आहे. ”स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट्स पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम कोच वॉशिंग उच्च कार्यक्षमतेवर आणि कमी आवश्यकतांवर सक्षम करतात,” असे रेल्वेने म्हटले आहे.
ऑक्टोबरमध्ये, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या जलद साफसफाईसाठी ’14 minutes of miracle’ ही संकल्पना सादर केली, ज्याची सुरुवात देशभरातील त्यांच्या संबंधित स्थानकांवर 29 वंदे भारत ट्रेनने केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत गाड्यांचा वक्तशीरपणा आणि टर्नअराउंड टाइम सुधारण्यासाठी या उपक्रमांतर्गत 14 मिनिटांत ट्रेनची स्वच्छता केली जाईल.
हा उपक्रम जपानमधील ओसाका आणि टोकियो सारख्या विविध स्थानकांवर ‘7 मिनिटे चमत्कार’ या संकल्पनेवर आधारित आहे जेथे बुलेट ट्रेनची स्वच्छता केली जाते आणि सात मिनिटांत दुसऱ्या प्रवासासाठी तयार केले जाते.