आयआरसीटीसीने महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी “Marvels of Maharashtra” हे टूर पॅकेज लाँच केले आहे. हे पॅकेज विशेषतः कुटुंबीयांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. आणि रेल्वे प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता येईल. वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि बीबी-का-मकबरा यांसारख्या अप्रतिम ठिकाणांना भेट देण्याची संधी यात मिळेल.
टूर पॅकेजची माहिती
कालावधी: 4 दिवस आणि 3 रात्री
प्रवास: रेल्वेने (अजिंठा एक्सप्रेस – ट्रेन नं. 17064)
प्रारंभ बिंदू: काचेगुडा रेल्वे स्थानक
निघण्याची वेळ: 21 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6:40 वाजता
हे पॅकेज तुम्ही कोणत्याही शुक्रवारी बुक करू शकता
टूर पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे?
हॉटेलमध्ये 1 रात्रीचा मुक्काम
फक्त नाश्त्याचा खर्च समाविष्ट
प्रवासादरम्यान मार्गदर्शक सेवा
महत्त्वाच्या ठिकाणांची सफर
शुल्क आणि प्रवास पर्याय
स्टँडर्ड श्रेणीमध्ये भाडे:
सिंगल प्रवासी:₹21,630 प्रति व्यक्ति
डबल शेअरिंग: ₹11,260 प्रति व्यक्ति
ट्रिपल शेअरिंग:₹8,640 प्रति व्यक्ति
5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी ₹7,210 प्रति मुलगा/मुलगी
बुकिंग कसे कराल?
IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे बुकिंग करा.
पॅकेज कोड: SHR105
अधिक माहितीसाठी संपर्क करा –
8287932229 / 9281030734 / 9701360701