जर तुम्ही सात ज्योतिर्लिंगांचे एकत्र दर्शन घेण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. इंडियन रेलवे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तुम्हाला कमी खर्चात आणि सोयीस्कर अशी यात्रा घडवून आणणार आहे. अवघ्या ८१६ रुपये प्रतिमहिना EMI मध्ये तुम्ही ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊ शकता. यामध्ये प्रवास, राहणे, नाश्ता, जेवण आणि स्थानिक प्रवास यांचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. फक्त बुकिंग करा आणि निश्चिंतपणे भगवान भोलेनाथांचे दर्शन घ्या!
भारत गौरव यात्रा
IRCTC मार्फत भारत गौरव यात्रा पर्यटक ट्रेन – ७ ज्योतिर्लिंग यात्रा ११ एप्रिल २०२४ पासून सुरू होत आहे, जी २२ मार्च २०२५पर्यंत सुरू राहील. ही यात्रा ११ रात्री आणि १२ दिवसांची असेल.
या पवित्र स्थळांना भेट देता येणार
या यात्रेत तुम्हाला खालील ज्योतिर्लिंग आणि अन्य धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येईल –
महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (उज्जैन)
सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग (गुजरात)
द्वारकाधीश मंदिर, भेट द्वारका आणि सिग्नेचर ब्रिज
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पंचवटी आणि काळाराम मंदिर (नाशिक)
भीमाशंकर ज्योतिर्लिंग(पुणे)
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि स्थानिक मंदिरे (औरंगाबाद)
या स्थानकांवरून मिळणार बोर्डिंग सुविधा
ही ट्रेन योगनगरी ऋषिकेश, हरिद्वार, मुरादाबाद, बरेली, शाहजहांपूर, हरदोई, लखनऊ, कानपूर, उरई, झांसी आणि ललितपूर या स्थानकांवरून उपलब्ध असेल.
पॅकेजचे संपूर्ण तपशील
कंफर्ट क्लास (₹५२,२०० प्रति व्यक्ती)
डिलक्स हॉटेल्समध्ये AC रूम (शेअरिंग/नॉन-शेअरिंग)
नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे शाकाहारी भोजन
स्थानिक AC बस प्रवास
स्टँडर्ड क्लास (₹३९,५५० प्रति व्यक्ती)
बजेट हॉटेल्समध्ये AC रूम (शेअरिंग/नॉन-शेअरिंग)
नॉन-AC बसमधून स्थानिक भ्रमंती
वॉश अँड चेंज सुविधा उपलब्ध
स्लीपर क्लास (₹२३,२०० प्रति व्यक्ती)
नॉन-AC बजेट हॉटेल्समध्ये शेअरिंगमध्ये निवास
वॉश अँड चेंज सुविधा उपलब्ध
नॉन-AC बसद्वारे स्थानिक भ्रमंती
८१६ रुपये महिना EMI मध्ये बुकिंगची संधी
IRCTCने LTC सुविधेसह EMI योजना आणली आहे, ज्यामुळे तुम्ही फक्त ८१६ रुपये प्रति महिना या किमतीत ही यात्रा करू शकता.
बुकिंग कसे कराल?
तुम्ही घरबसल्या बुकिंग करू शकता –
[IRCTC टूरिझम ऑफिस, गोमती नगर, लखनऊ[
[IRCTC वेबसाइट: www.irctctourism.com
ही यात्रा पहिल्या येणाऱ्यास प्राधान्य (First Come, First Serve) या तत्वावर आधारित आहे.