IRDA चे अध्यक्ष म्हणाले,”कोरोना विमा पॉलिसीअंतर्गत सुमारे 1.28 कोटी लोकांना मिळाले संरक्षण

नवी दिल्ली । विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे (Insurance Regulatory and Development Authority) अध्यक्ष सुभाषचंद्र खुंटिया (Subhash Chandra Khuntia) यांनी शुक्रवारी सांगितले की,”देशात कोरोना विमा पॉलिसीअंतर्गत आतापर्यंत 1.28 कोटी लोकांना संरक्षण देण्यात आले आहे”. ते म्हणाले की,” या पॉलिसींचे प्रीमियम कलेक्शन एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.”

कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक सादर केले होते
आयआरडीएच्या सूचनेनुसार कोरोना साथीच्या वेळी विमा कंपन्यांनी कोरोना कवच (Corona Kavach) आणि कोरोना रक्षक (Corona Rakshak) या दोन इन्शुरन्स प्रोडक्टसची ओळख करुन दिली. या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनीही कोविड -१९ बाबत कव्हरेज देखील जाहीर केले.

एक हजार कोटी रुपयांहून अधिक प्रीमियम कलेक्शन
इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वार्षिक परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना खंटिया म्हणाले, “स्टॅंडर्ड कोरोना कवच अंतर्गत 42 लाख लोकांना संरक्षण दिले गेले, तर कोरोना रक्षक अंतर्गत सुमारे 5.36 लाख लोकांना संरक्षण दिले गेले. एकूणच, कोरोनाशी संबंधित सर्व प्रोडक्टसमध्ये 1.28 कोटी लोकांना संरक्षण देण्यात आले आणि त्यांचे प्रीमियम कलेक्शन जवळपास एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होते.”

ब्रोकर्स आणि इन्शुरन्स कंपन्यांसाठी उत्तम संधी
ते म्हणाले की,” या साथीच्या रोगानंतर देशात ब्रोकर्स आणि इन्शुरन्स कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. यामुळे (साथीच्या रोगाने) लोकांना इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करुन दिली आहे.” ते म्हणाले की,”आता टायर -2, 3 आणि 4 शहरांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण आता या शहरांमधून ही वाढ येईल.” खुंटिया म्हणाले की,”आता गोष्टी अधिक चांगल्या दिसत आहेत. सरकारने साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही आनंदी आहोत.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like