Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला. या सणासुदीच्या काळात अनेकदा पैशांची गरज भासू शकते. विशेषतः नोकरदार वर्गाला त्याची जास्त आवश्यकता असते. कारण अशा लोकांचे उत्पन्न मर्यादित तर खर्च जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्ड खूप आधाराचे ठरते. तसेच सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून ग्राहकांना कॅशबॅक, रिवॉर्ड्स, पॉइंट्सद्वारे अनेक प्रकारच्या ऑफर्सही दिल्या जातात. या बरोबरच अनेक लोकं क्रेडिट कार्डमधून पैसेही काढतात. याला Cash Advance असे म्हणतात.

Getting a credit card? Here are five types of credit card charges you should be aware of | Business News

हे लक्षात घ्या कि, पैसे नसल्यामुळे अनेक वेळा लोकांकडून Credit Card मधून पैसे काढले जातात. कित्येकदा काही आणीबाणीच्या प्रसंगी कॅश एडव्हान्स उपयोगी पडू शकतो मात्र त्यासाठी आपल्याला शुल्क देखील भरावे लागते. जर आपल्यालाही क्रेडिट कार्डमधून पैसे काढायचे असतील तर त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आपल्याकडे असायला हवी. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Cash Advance - Meaning and Benefits | IDFC FIRST Bank

कॅश एडव्हान्सचा फायदा काय आहे ???

Credit Card मधून रोख रक्कम काढण्याचा एकच फायदा असा आहे की, ते आपल्याला आणीबाणीच्या प्रसंगी वापरता येतात. एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी जर आपल्या बँक खात्यात पैसे नसतील तर क्रेडिट कार्डद्वारे मदत मिळू शकेल. तसेच यामुळे आपल्याला गरजेच्या वेळी मित्र किंवा नातेवाईकांकडे पैसे मागण्याची गरज राहत नाही.

Credit Card Cash Withdrawal - Fee, Limit & Charges

कॅश एडव्हान्सचे नुकसान काय आहे ???

Credit Card मधून रोख रक्कम काढण्यासाठी आपल्याला आधी काही शुल्क भरावे लागते. जे सहसा काढलेल्या एकूण रकमेच्या 2.5 ते 3 टक्के इतके असते. जर आपण एक लाख रुपये कॅश एडव्हान्स घेत असाल तर त्यासाठी 2-3 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, त्यावर दरमहा सुमारे 3.5 टक्के व्याज द्यावे लागेल. तसेच, वारंवार कॅश अ‍ॅडव्हान्स घेतल्याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर देखील विपरित परिणाम होईल.

Credit Card Cash Withdrawal: Explained | IDFC FIRST Bank

किती पैसे काढता येतील ???

Credit Card मधून किती पैसे काढता येतील हे सहसा कार्डचे लिमिट आणि कार्डधारकाच्या क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून असते. आपल्याला सहसा कार्ड लिमिटच्या 20-40 टक्के रोख रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते आणि उर्वरित रक्कम ही फक्त कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच वापरली जाऊ शकते.

What Is a Credit Card Cash Advance? - NerdWallet

क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ???

Credit Card मधून पैसे काढण्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत हे आपल्याला आत्तापर्यंत कळले असेलच. हे खूप महागात पडू शकते. त्यामुळे शक्यतो क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका. फक्त एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीतचा हा पर्याय वापरणे आणि शक्य तितक्या लवकर पैसे परत करणे योग्य ठरेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/pay/cards/credit-cards

हे पण वाचा :

FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा

Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!

PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल !!! नवीन दर पहा

Stock Tips : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 कंपन्यांचे शेअर्स देऊ शकतात मजबूत नफा, त्याविषयी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या