FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडूंन रेपो दरात नुकतीच 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. अशा परिस्थितीत, FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल असा विचार आपल्याही डोक्यात आला असेल तर त्यामध्ये वावगे काही नाही. तर आज आपण कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळेल हे जाणून घेउयात…

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

हे लक्षात घ्या कि, मे महिन्यापासून आतापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने पॉलिसी दरात चार वेळा वाढ केली आहे. ज्यानंतर नॉन-बँकिंग फायनान्सिंग कंपन्या (NBFC) आणि पोस्ट ऑफिसने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात बदल केले आहेत. आता SBI, HDFC बँक आणि पोस्ट ऑफिस कडून FD वर चांगले व्याज मिळत आहेत. FD Rates

Bank FD Rates – Which fixed deposit is better to invest in fixed or floating rate? Who will get more profit and why? - Business League

खासगी क्षेत्रातील बँकांचे व्याजदर जाणून घ्या (FD Rates)

HDFC Bank : HDFC बँकेकडून 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे कालावधीच्या FD वर 6.1% व्याज दर दिला जात आहे.

ICICI Bank : बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे. आता या बँकेच्या FD वर 3.00% ते 6.10% पर्यंत व्याज मिळेल.

Axis Bank : या बँकेकडून सर्वसामान्यांसाठी 6.15 टक्के व्याजदर मिळत आहे. तसेच आता बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के आणि 30 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के व्याजदर देत आहे.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्याजदर जाणून घ्या (FD Rates)

Punjab National Bank : या बँकेकडून एफडी वर सर्वसामान्यांना 3 टक्के ते 5.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना (60 ते 80 वर्षे वयोगटातील) 3.50 टक्के ते 6.60 टक्के व्याज दर दिला जात आहे.

SBI : SBI सध्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 2.9% ते 5.65% पर्यंत व्याज देत आहे.

Bank Of Baroda : या बँकेकडून एफडी वर सर्वसामान्यांना 3 टक्के ते 5.65 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्क्यांवरून 6.65 टक्केव्याज दर दिला जात आहे.

Canara Bank : या बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. आता ही बँक 2.90 टक्के ते 6 टक्के व्याजदर देत आहे. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit-rate.html

हे पण वाचा :

Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!

PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल !!! नवीन दर पहा

WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल !!! नवीन दर पहा