पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल | “शासन आणि राष्ट्र या वेगवेगळ्या बाबी आहेत. राष्ट्राच्या संरक्षणार्थ जनतेने शासनाची कायम चिकित्सा केली पाहिजे. ”पण आपल्या देशात असं होतंय का हा प्रश्न आहे. आपले सरकार मार्केटिंगची तंत्रे वापरून आपल्याला गंडवत आहे का? पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय? कदाचित हो! अगदी साध्या भाषेत तीन टप्प्यांमध्ये हे समजून घेता येईल.

मदतीची विनंती

आपले सरकार अर्थात पंतप्रधान मोदी आपल्याला नेहमी काहीतरी विचित्र विनंती करताना, काहीतरी मागताना दिसून येतात. उदा.

1) नोटबंदी – “आज मी तुम्हा समस्त देशवासियांना एक विनंती करणार आहे, या लढाईमध्ये तुम्ही काही दिवस त्रास सहन कराल ना?”
2) स्वच्छ भारत – “मी तुमच्यापैकी प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो की वर्षभरात किमान १०० तास तुम्ही स्वच्छतेसाठी द्या, म्हणजे प्रत्येक आठवड्यात दोन तास स्वच्छतेसाठी.”
3) कोरोनावर उपाय – “मला तुमचे काही आठवडे द्या, कृपया जनता कर्फ्यू पाळा, कृपया बाहेर येऊन टाळ्या-थाळ्या वाजवा, कृपया ९ वाजता ९ मिनिटे दिवे मालवा” या विनंत्या केल्यानंतर काय होत?

बेंजामिन फ्रेन्क्लीन इफेक्ट

मानसशास्त्रातील हा अभ्यास असं सांगतो की, “जेव्हा आपण एखाद्याची विनंती मान्य करतो, त्याला/तिला मदत करतो, आपल्याला ती व्यक्ती जास्त आवडायला लागते.” तुम्हाला असा अनुभव असेल की काही वेळा तरुण मुली लहान-सहान बाबतीत आपल्या सोबतच्या तरुणांची, मित्रांची मदत घेतात व मदत करता करता मुलं त्यांच्या प्रेमात पडतात. ही संकल्पना व्यावसायिक जगतात ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रात सर्रास वापरली जाते. ज्यांच्या नावावर या संकल्पनेला ओळखले जाते ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बेंजामिन फ्रेन्क्लीन आपल्या राजकीय जीवनात विरोधकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर सर्रास करायचे. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलंय की, “ज्याने तुमची एकदा मदत केली आहे तोच तुमची आणखी मदत करू शकण्याची शक्यता जास्त आहे, अगदी तुम्ही ज्याला मदत केली आहे अशा व्यक्तिपेक्षाही जास्त.”

Benjamin Franklin Effect

आपल्या सर्वात एक हिरो दडलाय…
पंतप्रधान मोदींनी विनंती केलेल्या या अगदी साध्या साध्या कृती लोकांमध्ये, आपण स्वत: कुणीतरी आहेत, आपल्याला महत्व आहे, आपण एक चांगली व्यक्ती आहोत, अशी भावना निर्माण करतात. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीचे एका हिरोमध्ये होणारे हे रूपांतर आपल्याला नकळत हवहवेसे वाटते व जेव्हा हे रूपांतर करणारा व्यक्ती इतर कुणी नसून आपले पंतप्रधान आहेत तेव्हा तर याची उपलब्धी कित्येक पटींनी वाढते.

Narendra Modi Hero

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही भावनिकरीत्या गुंतता !

Narendra Modi Bhakts
आता पंतप्रधान किंवा शासनावर केलेली टीका किंवा चिकित्सा तुम्ही स्वतःला लावून घेता. त्यांची चूक मान्य करणे म्हणजे स्वतःची चूक मान्य करणे जे आपल्याला कोणालाच करायला आवडत नाही.

यशाची व्याख्या बदलणे
दुसऱ्या टप्प्यात ते शासनातर्फे कसलेही ठोस वचन द्यायचे टाळतात. कुठल्याही कृतीच्या अंतिम फलीतापेक्षा, जनतेची कृती हेच शासनाच्या यशाचे मोजमाप होऊन जाते. जाहीर केलेल्या यशाला जनता प्रश्न विचारत नाही कारण ते त्यात कृतीद्वारे भावनिकरीत्या गुंतले आहेत आणि असे प्रश्न विचारणे म्हणजे स्वतःच्या यशावर स्वतः प्रश्न उपस्थित करणे होईल.

Narendra Modi

निर्लज्ज विनम्रता
समजा त्यांच्या स्वप्नाप्रमाणे (नियोजनाप्रमाणे नव्हे) काही झालं नाहीच तर ते आणखी विनंत्या आणि आवाहन करतात. नेमक्या मुद्द्यांना ते कधीच हात घालत नाहीत, त्यावर उपाय योजना सांगत नाहीत, ते कुठे चुकले ते सांगत नाहीत, ते फक्त आणखी अपेक्षा व्यक्त करतात, आपल्याकडूनच..

Narendra Modi

एखादी चहाची टपरी चालवावी त्याप्रमाणे देश चालवला जात आहे. आधी पोकळ घोषणा आणि मागाहून त्यासाठी नियोजन हे नेहमीचच झालं आहे. एखाद्या लहरी राजाप्रमाणे निर्णय घेतले जातात, मागाहून बदलले जातात, कधी थोपवले जातात. मधल्या काळात भरडला जाणारा प्रत्येक माणूस, गेलेला प्रत्येक जीव, उगारलेली प्रत्येक काठी, उपाशी राहिलेला प्रत्येक जीव, घरी पोचण्यासाठी उचललेले प्रत्येक अनवाणी पाऊल, यांच्या वेदनेचा, पापाचा भार नियोजनशून्य निर्णय घेणाऱ्या शासनाला उचलावाच लागेल.

ता.क. – ‘राजा नागडा आहे’ हे सांगायची आता आपणच हिम्मत करायला हवी.