कोविड -19 लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे का? संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 18 वर्षावरील सर्व लोकांना 1 मे पासून कोविड -19 ची लस घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाद्वारे (भारत सरकार आणि भारत सरकार व्यतिरिक्त) सर्व राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग होतील असे सरकारचे म्हणणे आहे. ही लस मिळविण्यासाठी CoWIN पोर्टल रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल. दरम्यान, कोविड -19 लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डचा वापर करण्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. चला तर मग जाणून घेऊयात की, लसीच्या रजिस्ट्रेशन साठी आधार कार्ड आवश्यक आहे की नाही? त्याबद्दलच्या आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत-

कोविड -19 लसीकरणासाठी कोठे रजिस्ट्रेशन करावे ?
कोविड -19 लसीकरणासाठी तुम्ही CoWIN पोर्टल लिंक www.cowin.gov.in येथे भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे. येथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी Register/Sign In yourself टॅबवर क्लिक करा.

आधार कार्डशिवाय रजिस्ट्रेशन करू शकतो?
अगदी होय, आपण खालीलपैकी कोणतेही आयडी प्रूफ वापरून पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता.

1. Aadhaar card
2. Driving License

3. PAN card
4. Passport
5. Pension Passbook
6. NPR Smart Card
7. Voter ID (EPIC)

हा विषय उपस्थित केला गेला आहे
अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विचारले होते की,’ कैद्यांना कोरोना लस देण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे का ? कैद्यांना आधार कार्ड नसल्याने लस नाकारता येणार नाही. जेव्हा कोर्टाकडून हा प्रश्न विचारला गेला तेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला की, अनेकांना आधार कार्ड नसल्यामुळे लस घेता येत नाही. या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला विचारले आहे की,”ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही त्यांना ही लस कशी मिळेल. त्याचबरोबर तुरुंगात असलेल्या या कैद्यांचा मुद्दादेखील कोर्टाने उपस्थित केला असून त्यांचे आधार कार्ड बनलेले नाही.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment