नवी दिल्ली । केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला की, 16 जून 2021 पासून देशात फक्त BIS हॉलमार्किंगचे दागिनेच विकले जातील. म्हणजेच, 15 जूनपासून देशात हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली होती आणि आता ज्वेलर्स केवळ हॉलमार्क केलेले दागिनेच विकू शकतील. दरम्यान, एक अशीही बातमी व्हायरल होते आहे की सरकार सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग मागे घेत आहे. मात्र, मंगळवारी या वृत्ताला सरकारने नकार दिला आणि सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्यपणे सुरू ठेवण्यात येणार असून वेगवेगळ्या टप्प्यांतून याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सरकारचे काय मत आहे?
मंगळवारी सरकारने म्हटले आहे की, सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने राबविले जात असून ते मागे घेण्याचे वृत्त बनावट आहे. सरकारकडून आलेल्या एका अधिकृत निवेदनात असे म्हटले गेले आहे की, “सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग अनिवार्य करण्याबाबत भारत सरकारने दिलेला आदेश मागे घेण्यात आल्याची बातमी सोशल मीडियाच्या काही भागांत प्रसिद्ध झाली.”
याची अंमलबजावणी 256 जिल्ह्यांमध्ये लागू झाली आहे.
सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी अनिवार्य हॉलमार्किंग सिस्टम टप्प्याटप्प्याने 16 जूनपासून लागू केली गेली आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने 256 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. हॉलमार्किंगच्या नियमांतर्गत, ज्वेलर किंवा बुलियन त्याच्या ग्राहकांना समान गुणवत्ता देतो. सध्या 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दागिने विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा