खरंच… सरकार सर्व बेरोजगारांना ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजने’ अंतर्गत 3500 रुपये देत आहे का? अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने अशा अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे मजूर आणि गरिबांना दिलासा मिळू शकतो. सरकारच्या या घोषणांबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यापैकीच एका पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगारांना 3,500 रुपये ट्रान्सफर केले जात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टसह एक लिंक देखील शेअर केली जात आहे, ज्यात असे म्हटले गेले आहे की, दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आपली आवश्यक माहिती द्यावी लागेल. या बातमीचे सत्य जाणून घेऊयात…

पोस्टमध्ये काय लिहिले आहे ते जाणून घ्या
या फॉरवर्डिंग पोस्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, आपण या योजनेअंतर्गत आपले रजिस्ट्रेशन करावे. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 3500 रुपये दिले जातील. मोफत अर्ज, पात्रता दहावी पास आणि वय 18 ते 40 निश्चित असल्याचे सांगितले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.

सत्य काय आहे?
PIB फॅक्ट चेकने ही बातमी पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. PIB ने आपल्या ट्विटरवरून इशारा दिला आहे की, भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका हा फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो

तुमची माहिती धोक्यात येऊ शकते
कधीकधी काही कंपन्या त्यांच्या वेबसाईटद्वारे रेव्हेन्यू जनरेशनसाठी असे डावपेच वापरतात. हे दोन प्रकारे केले जाते. पहिले, आपल्या वेबसाइटवर क्लिक वाढवून. वेबसाईटवर जितके जास्त क्लिक, त्या वेबसाईटवर जाहिरातीचा खर्च जास्त. त्याच वेळी, दुसरी पद्धत सायबर गुन्हेगारीच्या श्रेणीत येते. यामध्ये कंपनी तुमच्या मोबाईलची सर्व माहिती गोळा करते आणि ती बिझनेस प्रमोशन कंपन्यांना विकते. कंपन्या या डेटा आणि माहितीचा वापर बाजार आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतात.

आपण या प्रकारची फसवणूक कशी टाळू शकता?
सायबर तज्ञ सांगतात की, जर लिंक कोणत्याही बँक, वित्तीय संस्था इत्यादींकडून ईमेलद्वारे पाठवला गेला असेल तर ती न उघडता संबंधित बँकेच्या वेबसाईटवर जाऊन भेट द्या.

Leave a Comment