हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळा सुरू झाला की विविध आजार पसरण्यास सुरुवात होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या काळात डेंगू, मलेरिया, चिकनगुनियांसारखे आजार तर वेगाने पसरतात. त्यामुळे दरवर्षी या काळात हजारो लोकांना उपचारासाठी रुग्णालय दाखल व्हावे लागते. यामध्ये डेंगूचा आजार बरा व्हायला सर्वात जास्त काळ जातो. परिणामी हे उपचार घेताना लाखो रुपये खर्च होतात. खासगी रुग्णालयात उपचारांवर बराच खर्च येतो. हा खर्च 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. परंतु, आरोग्य विमा असल्यामुळे खर्चाला बळी पडावे लागत नाही.
त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा आजारांच्या उपचारासाठी तुमच्याकडे आरोग्य विमा (Health Policy) असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असेल, तर त्याचे कव्हर अमाउंट किती आहे हे तपासणे देखील आवश्यक आहे. तसेच, त्यात कोणत्या आजारांचा उपचार कव्हर केला जातो हेही पाहावे लागेल. परंतु जर तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर लवकरच ती घेणे गरजेचं असेल. यामुळे तुमचे लाखोंचे नुकसान टळेल.
कोणती हेल्थ पॉलिसी घ्यावी?
लक्षात घ्या की, आरोग्य विमा पॉलिसींमध्ये 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असतो. त्यामुळे लवकरात लवकर हेल्थ पॉलिसी खरेदी करणे कधीही फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य पॉलिसी घेत असाल असाल तर ते अत्यंत फायदेशीर ठरेल. अशा धोरणाला फ्लोटर पॉलिसी म्हणतात. यामध्ये तुम्ही, तुमची पत्नी आणि मुलांचा समावेश केला जातो. कधीही एका चांगल्या विमा कंपनीकडून पॉलिसी घ्यावी. ज्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलच्या यादीमध्ये तुमच्या घराजवळील हॉस्पिटल्सचा समावेश असेल. हे तुम्ही तुमच्या पालकांसाठी वेगळी पॉलिसी देखील घेऊ शकता. यावर तुम्हाला टॅक्समध्ये सूटही मिळेल. अशा पॉलिसी घेतल्यामुळे उपचारांच्या काळात लाखो रुपयांची बचत होईल.