900 लोकांना Zoom Meeting द्वारे कामावरून काढून टाकणारे विशाल गर्ग कोण आहेत ? त्यांच्याबद्दल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । यूएस-बेस्ड कंपनीचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल गर्ग यांनी Zoom द्वारे आयोजित एका वेबिनार दरम्यान अचानक 900 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे नऊ टक्के कर्मचारी आहेत. या घटनेनंतर सर्वांना विशाल गर्गबद्दल जाणून घ्यायचे आहे. तसेच त्यांनी असे का केले हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना आहे.

प्रोफेशनल नेटवर्किंग साइट लिंक्डइनवरील त्याच्या प्रोफाइलनुसार, गर्गने 1991-95 दरम्यान न्यूयॉर्कमधील स्टुयवेसंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून बिझनेसचे शिक्षण घेतले. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशाल गर्ग जेव्हा फक्त सात वर्षांचा होता तेव्हा तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. मात्र, तो भारतातील कोणत्या राज्याचा होता… याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

खरं तर,Zoom वरील एका ‘ऑनलाइन मीटिंग’ दरम्यान, घरमालकांना होमलोनसह विविध सेवा पुरवणाऱ्या Better.com चे सीईओ विशाल गर्ग यांनी अचानक नऊ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. या रिपोर्ट्स नुसार म्हटले गेले आहे की गर्ग यांनी बाजारातील कार्यक्षमता, कामगिरी आणि उत्पादकता ही कारणे नमूद केली आहेत.

त्यांनी सांगितले कि, “जर तुम्ही या वेबिनारमध्ये असाल, तर तुम्ही त्या दुर्दैवी गटाचा भाग आहात ज्यांना कामावरून काढून टाकले जात आहे”. रिपोर्ट्स नुसार, सीईओने माहिती दिली की, या वेबिनारमध्ये 900 कर्मचाऱ्यांचा समावेश होता ज्यांना सुट्टी सुरू होण्यापूर्वी काढून टाकण्यात आले होते. सीईओ पुढे म्हणाला की,” कर्मचार्‍यांना मानव संसाधन विभागा (HR Dept) कडून एक ई-मेल मिळेल, ज्यामध्ये फायदे आणि काढून टाकण्याबद्दलची माहिती असेल.”