तुमची पत्नी मोबाईलवरुन लोकेशन ट्रेस करतेय? पती नजर ठेऊन आहे? असं करुन घ्या माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधी कधी पती आपल्या पत्नीला खोटं बोलून बाहेर कुठे गेला आणि पत्नीने त्याचे लोकेशन चेक केलं तर मात्र पतीचं काय होईल याचा काय नेम नाही. त्यामुळे आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी काय करावं हे आपण समजून घेऊया

लोकेशन शेअरिंगचा पर्याय आता जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, गोपनीयतेच्या दृष्टीने ही एक मोठी चिंतेची बाब आहे. बऱ्याच लोकांसाठी, Google चे लोकेशन ट्रॅकिंग आणि हिस्ट्री सेव्ह ठेवल्याने काही फरक पडत नाही. मात्र, अशीही काही लोकं आहेत ज्यांना आपले लोकेशन कोनासोबतच शेअर करायचं नसत

अशा परिस्थितीत, काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही Google किंवा इतर रँडम Apps ना आपले लोकेशन ट्रॅक करण्यापासून थांबवू शकता. या व्यतिरिक्त जर कोणाला तुमचे लोकेशन सापडले असेल आणि तुमच्या नकळत ते शेअर करत असेल तर ते देखील तुम्ही बंद करू शकता. Android वर लोकेशन ट्रॅकिंग अगदी सहजपणे डिसेबल केले जाऊ शकते. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर येथे काही स्टेप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.

या स्टेप्स फॉलो केल्यानंतर, तुम्ही Android फोनवर Google साठीचे लोकेशन ट्रॅकिंग बंद करू शकाल. यासाठी तुम्हाला सर्वांत आधी तुमच्या अँड्रॉईड फोनच्या होम स्क्रीनवर जावे लागेल. यानंतर, क्विक सेटिंग्ज मेनू उघडण्यासाठी खाली स्वाइप करा.

नंतर तुम्हाला लोकेशन आयकॉन जास्त वेळ दाबून ठेवावे लागेल. यानंतर लोकेशन पेज ओपन होईल. तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन पेजही उघडू शकता. यामध्ये तुम्ही लोकेशन ट्रॅक करणारे Apps पाहू शकाल.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार Apps साठी लोकेशन टॉगल करू शकता. याशिवाय गुगल मॅपच्या माध्यमातून कोणी तुमचे लोकेशन शेअर करत असेल तर त्याचा ऍड्रेसही येथे मिळू शकतो. यासाठी तुम्हाला लोकेशन ऑप्शनमधील गुगल लोकेशन शेअरिंग या पर्यायावर टॅप करावे लागेल.

तुमचे लोकेशन इतर कोणत्याही खात्यासह शेअर केले जास्त असल्यास तुम्ही ते येथे तपासू शकाल तसेच तुम्ही ते बंद देखील करू शकाल. गुगल मॅपमध्ये लोकेशन शेअरिंगची सुविधा आहे, ज्याद्वारे यूजर्सचे लोकेशन इतरांसोबत शेअर करता येते.