हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपा खासदार मनेका गांधी यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेसवर (इस्कॉन) गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी इस्कॉन या संस्थेला फसवणूक करणारी संस्था म्हटले आहे. तसेच, “देशातील सर्वात मोठे विश्वासघाती कोणी असेल तर ते इस्कॉन आहे, इस्कॉन हे गोशाळेतील गाईंना कत्तलखान्यात विकते.” असा गंभीर आरोप देखील मनेका गांधी यांनी लावला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, इस्कॉनने मेनका गांधी यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. त्यांनी, थेट इस्कॉनवर गंभीर आरोप केले आहेत. मनेका गांधी यांनी म्हणले आहे की, “मी अलीकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील गोशाळेत गेली होते. इस्कॉनकडून या गोशाळेच संचालन केलं जातं. तिथे गायींचा अवस्था खूपच खराब होती. गोशाळेत एकही बछडा नव्हता. याचा अर्थ ते गायी विकून टाकतात” तसेच, “इस्कॉन गायी कत्तलखान्यात विकतात, त्यांना ते मारून टाकतात” असे देखील मनेका गांधी यांनी म्हणले आहे.
दरम्यान मनेका गांधी यांनी लावलेले हे सर्व आरोप इस्कॉनने फेटाळून लावले आहे. इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ता युधीष्ठीर गोविंदा दास यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, “इस्कॉन संस्था ही भारतातच नाही तर जागतिक पातळीवर गायी आणि बैलांची सुरक्षा आणि देखभाल करते. आमच्या येथे गायींची सेवा त्यांच्या अखेपर्यंत केली जाते. त्यांनी खाटीकांना विकण्यात येत नाही”