बांगलादेशात होळीपूर्वी इस्कॉन मंदिरावर हल्ला, 150 लोकांनी केली तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ढाका । होळीच्या एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन मंदिरात हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 150 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच तेथे लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याची काही छायाचित्रे आणि माहिती शेअर केली आहे. यावेळी मंदिराची भिंत पाडण्यात आल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. यासोबतच तेथून मालही लुटण्यात आला आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पोलिसांनाही या हल्ल्याची माहिती दिली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीही बांगलादेशात मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौमुनी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण गौरा नित्यानंद ज्यू मंदिरावरही जमावाने हल्ला करून तोडफोड केली होती. या हल्ल्यात 50 हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यासोबतच इतर अनेक शहरांमध्ये मंदिरांवरही हल्ले झाले.

Leave a Comment