चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.

जेआरडी टाटा स्पोर्टस काॅम्पलेक्स मैदानावर झालेल्या लीगच्या आपल्या सातव्या सामन्यात दोनवेळच्या विजेत्या चेन्नई एफसीने सामन्याच्या २६ व्या मिनिटाला नेरीजुस्क वालस्किपच्या गोलच्या मदतीने १-० ने आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ८९ व्या मिनिटाला जमशेदपूर संघाच्या वैनमलसावमाने गोल करत सामन्यात १-१ ने बरोबरी साधली आणि शेवटी सामना बरोबरीत (ड्रा) सुटला.

जमशेदपूर संघाचा हा सात सामन्यातील तीसरा बरोबरीचा (ड्रा) सामना ठरला. गुणतालिकेत संघ १२ गुणासह चौथ्या स्थानी आहे. दुसरीकडे नवीन प्रशिक्षक ओवेन काॅयले याच्या मार्गदर्शनाखाली पहिला सामना खेळत असलेला चेन्नईचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी विराजमान आहे.

Leave a Comment