मोहम्मद पैगंबर वाद चिघळला; अल कायदा पाठोपाठ IS ची भारताला हल्ल्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद जगभर उमटले असून आता अल कायदा पाठोपाठ इस्लामिक स्टेट ने भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ISKP ने त्यांच्या मुखपत्र अल अजैम फाऊंडेशनद्वारे न्यूज बुलेटिन सेवा सुरू केली आहे. पहिल्या न्यूज बुलेटिनमध्ये संघटनेने भारत आणि ईशनिंदा या विषयावर विशेष चर्चा केल्याचे वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, खोरासान डायरीच्या स्वतंत्र न्यूज हँडलच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की व्हिडिओमध्ये नूपुर शर्मा आणि बुलडोझरच्या कारवाईचा उल्लेख करण्यात आला आहे.

खोरासान डायरीनुसार, व्हिडिओमध्ये भारतासोबत मुत्सद्दीपणे संबंध ठेवल्याबद्दल तालिबानवरही टीका करण्यात आली आहे. यामध्ये मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब याने एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यामुळे त्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याकुब हे काळजीवाहू संरक्षण मंत्री आहेत.

अल कायदाची धमकी-

दरम्यान, यापूर्वी दहशतवादी संघटना अल कायदाने नुपूर शर्मा यांच्या विधानावरून भारतात आत्मघातकी हल्ल्याचा इशारा दिला होता. आमच्या पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू आणि आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधून आमच्या पैगंबराचा अपमान करणार्‍यांना आम्ही उडवून लावू… दिल्ली, बॉम्बे, यूपी आणि गुजरातमधील भगव्या दहशतवाद्यांनी त्यांची वाट पहावी अस पत्रक अल कायदा ने जारी केले होते.

Leave a Comment