हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो… जयंत पाटील (Jayant Patil) यांचा हा गाजलेला पॉलिटिकल डायलॉग… राजकीय कोपरखळ्या कशा मारायच्या? ते जयंत पाटलांना पक्क ठाऊक… राष्ट्रवादी फुटली… दोन तुकडे झाले… पण शरद पवारांसोबत असलेली आपली निष्ठा कायम ठेवत त्यांनी कठीण काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं… लोकसभेला ८०च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली… अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्याच्या घडीला जयंत पाटील वरच्या स्थानावर आहेत… पण हे राज्यस्तरावरचं राजकारण पाटलांना शक्य होतं ते त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामुळे… 1990 पासून इस्लामपुरात जयंत पाटलांना नो चॅलेंज आहे… म्हणूनच तब्बल 35 वर्ष नॉन स्टॉप आमदारकीचा त्यांचा वारू अद्याप विरोधकांना रोखून धरता आला नाही… पण विरोधक एकत्र आले तर जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम होऊ शकतो, हे माहित असूनही इथं विरोधकांची एकी होत नाही… आणि जयंत पाटलांना तोड देता येत नाही… म्हणूनच येणाऱ्या विधानसभेला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विरोधक करिष्मा करणार का? जयंत पाटलांच्या 35 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीला सुरुंग लागणार का? जयंत पाटलांच्या बालेकिल्लाला खिंडार पाडण्यासाठी विरोधक एकजूट दाखवणार का? नेमकं इस्लामपूरचं जिओ पॉलिटिकल डिकोडींग कसं आहे? त्याचीच ही इन साईड स्टोरी…
स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं… विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेल्या जयंत पाटलांच्या नावावर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड देखील आहे… आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास मंत्री तर आर आर पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचीही जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर होती… यावरून जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्या फळीतील दिग्गज नेते आहेत, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पदाधिकारी, महामंडळ यांच्या नियुक्त्या जयंत पाटील करतात… राष्ट्रवादीच्या फुटीत… पक्षाची ठामपणे बाजू मांडणं… नव नाव आणि चिन्हासह लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण… आणि तब्बल 8 जागा निकालात काढणं… याच श्रेय जितकं शरद पवारांना जातं तितकच ते जयंत पाटलांनाही द्यावं लागतं…
पण ही सगळी राजकीय घोडदौड जयंत पाटलांना शक्य होते ती त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामुळे… राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कृष्णा दूध संघ, राजारामबापू टेक्सटाईल पार्क, कासेगाव एज्युकेशन सोसायटी, राजारामबापू सहकारी बँक आणि साखर कारखाना या आणि अशा अनेक सहकारी संस्थात्मक जाळ मतदार संघात विणल्यामुळे एक हक्काचा व्होट बँक हा कायम जयंत पाटलांच्या सोबत राहतो… पण हा सगळा प्रवास सुरू झाला तो 1990 ला.. आपल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या बाबा सूर्यवंशी यांना लाखभराहून अधिकच्या अंतरानं यानंतर भाजपच्या अशोक पाटील, सी. बी. पाटील, रघुनाथ पाटील, वैभव नायकवडी यांनी जयंत पाटलांना अनेकदा लढती दिल्या… विरोधकांनी एकत्र येत एकाच उमेदवाराच्या मागे ताकद लावली… पण कुठल्याच उमेदवाराला जयंत पाटलांचं लीड तोडता आलं नाही… 2019 ला तर भाजपची लाट असतानाही जयंत पाटलांनी तब्बल ७२ हजारांचं लीड घेत शिवसेनेचे गौरव नायकवडी आणि अपक्ष बंडखोर निशिकांत पाटील यांना घाम फोडला होता… त्यामुळे सांगून टप्प्यात कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचाच कार्यक्रम करणे वाटतं तितकं सोप राहिलं नाही…
पण हा सगळा गेला बाजार इतिहास नीट पाहिला तर विरोधकांची एकी नं होणं हा जयंत पाटलांच्या विजयाचा वारू रोखण्यामागचा सर्वात मोठा अडथळा असल्याचं आढळून आलं आहे… याही वेळेस एकाच उमेदवाराच्या मागे ताकद लावण्याचा विचार विरोधकांचा आहे… पण इस्लामपुरासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप दंड थोपटण्यासाठी तयार असल्याने पुन्हा एकदा मत विभाजन पाटलांच्या पत्थ्यावर पडण्याचा धोका आहे…भाजपचे जिल्हाध्यक्ष बिग बी निशिकांत पाटील मागील वर्षभरापासून इस्लामपुरातून लढतीसाठी मतदारसंघात घाम गाळतायत… तर शिंदे गटाकडून गौरव नायकवडी, आनंदराव पवार तिकिटासाठी इच्छुक आहेत… त्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सर्वांसमक्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी उमेदवार म्हणून निशिकांत पाटलांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आता जयंत पाटलांच्या विरोधात सर्वानुमते एकच उमेदवार रिंगणात दिसेल… की पुन्हा बंडखोरी होईल.. हे सर्व आता महायुतीतील नेत्यांनाच सांभाळून घ्यायचं आहे…
मुळात 2019 लाच भाजपकडून निशिकांत पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीसाठी तयार होते… पण जागा वाटपात इस्लामपूरची जागा शिवसेनेला गेल्यामुळे नाईलाजाने निशिकांत यांना बंद करावं लागलं… विशेष म्हणजे युतीच्या जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ भाजपला जाऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाल्याची चर्चाही मतदारसंघात अधून मधून होत असते… जयंत पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांतील जिव्हाळ्याचे संबंधही जगजाहीर आहेत… म्हणूनच भाजप जाणून बुजून या मतदारसंघाकडे कानाडोळा करते… अशा राजकीय वावड्याही उठत असतात… हे सर्व एका क्षणाला खरं मानलं तरी राष्ट्रवादीच्या फुटीत महायुती सोबत न येता जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहिल्याने भाजप आता काही केल्या आपली सारी ताकद पणाला लावून जयंत पाटलांना इस्लामपुरात आव्हान उभा करणार, हे तर कन्फर्म आहे… पण शिंदे गटाची भूमिका आणि इतर सत्ताकेंद्र नेमकी काय भूमिका घेतात? यावर जयंत पाटलांना जोर का झटका बसणार का? याबाबत स्पष्टपणे बोलता येऊ शकतं…
वैभव पवार, गौरव नायकवडी, निशिकांत पाटील असे सगळेच जयंत पाटलांना चितपट करण्यासाठी एका पायावर तयार आहेत… पण यापैकी नेमक्या कोणत्या भिडूत टप्प्यात चेंडू आल्यावरही जयंत पाटलांना क्लीन बोल करण्याची हिम्मत आहे? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल… बाकी तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या विजयाचा सिलसिला असाच कायम ठेवतील का? की विरोधक पाटलांच्या विजयाचा वारू 2024 ला अडवून ठेवतील? इस्लामपूरची जनता यंदा कुणाला आमदारकीचा गुलाल उधळण्याचा चान्स देतेय? तुमचं पॉलिटिकल प्रेडिक्शन काय सांगत? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा… अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद…