ISRO Chandrayaan 3 | आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या अंतराळात नक्की काय चाललेले आहे? इथे कोणत्या गोष्टी असतील? या सगळ्याची उत्सुकता नेहमीच असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था देखील अवकाशातील विविध गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. अवकाश क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठे योगदान त्यांनी दिलेले आहेत. अंतराळामध्ये अनेक मोहिमा केलेल्या आहेत. आणि त्या यशस्वी देखील झालेल्या आहेत. परंतु आता यशामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. ती म्हणजे आता चंद्रयान 3 (ISRO Chandrayaan 3) ने एक मोठी उकल केली आहे. ज्यामुळे एक मोठे सत्य जगासमोर आलेले आहे.
मागील वर्षी चंद्रयान 3 चे (ISRO Chandrayaan 3) लँडिंग झालेले आहे. आणि 1 वर्षा नंतरही हे चंद्रयान 3 कार्यरत आहेत. या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला पृथ्वीवर पोहोचत आहे. भारताने दक्षिण ध्रुवापासून चंद्रयान 3 ची मोहीम सुरू केलेली आहे. असे म्हटले जाते की, दक्षिण ध्रुवावर गेल्या अनेक वर्षापूर्वी समुद्राचा अच्छादन होतं. म्हणजेच असे म्हटले जाते की, चंद्राच्या पृष्ठभागापासून आतल्या भागांमध्ये लावारस होता. या लाभार्थ्याच्या साठ्यांना मॅग्मा ओशन किंवा लावारसाचा महासागर असे देखील म्हटले जाते.
याबद्दल अनेक शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी त्यांचे मत मांडलेले आहेत. आणि त्यांनी मांडलेले मतानुसार 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा चंद्राची उत्पत्ती झाली होती. तेव्हा त्याचे तापमान हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर फेरोन आणि एनर्थोसाइड या नावाचं एक खनिज चंद्राच्या पृष्ठभागावर साचू लागलं. हे खनिज वजनाने अगदी हलकं होतं. त्यामुळे ते चंद्रावर ते तरंगत राहिले. आणि त्यामुळे या वितळलेल्या पर्वतावर चंद्राच्या पृष्ठभागावर एक थर तयार झाला. .
अनेक शास्त्रज्ञांनी चंद्राच्या उत्पत्ती संदर्भात अनेक सिद्धांत मांडलेले आहे. आणि ते सिद्धांत दिवसेंदिवस भक्कम होताना दिसत आहे. भारताने देखील याबाबत अनेक उकल मांडलेले आहेत. ते आपल्या मोहिमेदरम्यान त्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. चंद्रावर जी काही नवीन माहिती मिळत आहे. ती माहिती पृथ्वीवर येत आहे.
चंद्राचे केलेले निरीक्षण आणि मांडण्यात आलेल्या सिद्धांतानुसार चंद्राची उत्पत्ती ही प्रोटोप्लेनेट ग्रह निर्माण होण्यापूर्वीच झालेली आहे. यापूर्वी लादण्याच्या क्रियेमुळे ही झाली आहे. यातूनच एक मोठा ग्रह म्हणजे पृथ्वी आणि लघुग्रह चंद्र निर्माण झाला. चंद्र हा खूप उष्ण होता. त्यामुळे त्याच्यावरील सगळ्या आवरण वितळले आणि मॅग्मा महासागराची उत्पत्ती झाली.