जावळी प्रतिनीधी । सातारा जावळी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून दुर्गम जावलीतील सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधांची दखल घेऊन रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ प्रदेशातील 5 प्राथमिक केंद्रे व 24 उपकेंद्रावर मंजुर असलेल्या 160 पदांपैकी 53 पदे रिक्त आहेत. त्यामुळे जावळीची आरोग्यसेवा कोरोनाकाळात खिळखिळी झाली आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवेची वणवा भासत आहे. हि वाणवा कधी संपणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून लोकप्रतिनिधींना विचारला जाऊ लागला आहे .
दुर्गम व डोंगराळ जावळीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्याने या ठिकाणी आरोग्य सेवेची कमतरता भासत असून ही प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे साथ रोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपुरे मनुष्यबळ जावळीतील साथरोग वाढीचे महत्वाचे कारण बनले आहे. जावळी तालुक्याने जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेवर दोनवेळा नेत्तृत्व करुन देखील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरता आलेली नाही.
जावळीचे नेतृत्व करणारे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रशासनात मजबूत वजन आहे. भाजपचे आमदार असुन देखील राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्याच लॉबिंग आजही शिवधनुष्य पेलणारे आहे. मात्र ,आमदार शिवेंद्रराजेंना जावलीच्या आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आले असल्याचे सत्य देखील नाकारून चालणार नाही. मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची मुलभुत सुविधाचा वाणवा मिटवण्याकरीता आमदार शिवेद्रराजेंकडून कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून आरोग्य सेवेचे प्रश्न मार्गी लावले जातील का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे जावली तालुक्यांतील आरोग्य विभागातील रिक्त पदांकरीता आमदार म्हणुन माझा पाठपुरावा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जावळी तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पद भरण्याकरीता मागणी केली आहे. राज्यामध्ये आगामी होणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीनंतर जावळी तालुक्यातील आरोग्य सेवक व वैद्यकीय अधिकारी यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत.