महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्राने सुरक्षा पुरवणं धक्कादायक- अनिल देशमुख

मुंबई । मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.

दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ज्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभारही मानले आहेत. अ

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like