व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

निजामाच्या विचारांच्या लोकांना मराठवाड्यातील लोक महापालिकांमध्ये निवडून देतात हे दुर्दैव

औरंगाबाद – मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. अत्याचारी पाचवी निजामाचा पराभव केला. कासिम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात. हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली. लोकसंवाद फाउंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड बोलत होते.

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, मराठवाड्याला एक वर्ष दोन महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत सरकार मदतीला आले. परंतु मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा कासीम रझवी हा शरण आला, तेव्हा त्याच भारतात राहायचे की पाकिस्तानात असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने पाकिस्तानची निवड केली.

निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र, आज त्याच निजामाचा विचाराचे लोक महानगरपालिकांचे इतर ठिकाणी निवडून येत आहेत, हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे असे आव्हाड म्हणाले.