देवाचा कोप की निसर्गाची अवकृपा!! या गावात पडत नाही कधीच पाऊस, सगळीकडे फक्त दुष्काळ

Al Hutaib
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदा सगळीकडेच तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे आत्तापासूनच शेतकरी आणि सामान्य लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्याकडे जून महिना सुरू झाला की पावसाच्या सरी बसायला सुरुवात होते. आणि सगळीकडे हिरवेगार वातावरण पसरते. परंतु, जगात असेही एक गाव आहे जिथे कधी पाऊसच पडत नाही. येथे असतो तो फक्त दुष्काळ. तरी देखील पर्यटक हे गाव पाहण्यासाठी आतुरतेने जातात.

कोणते आहे हे गाव?

राजधानी सना शहराच्या पश्चिमेला वसलेले आहे येमेनमधील ‘अल हुतैब’ गाव. (Al Hutaib village) पर्यटकांसाठी हे गाव एक अद्भुत आकर्षण आहे. कारण या ठिकाणी कधी पाऊसच पडत नाही. त्यामुळे येथील निसर्ग देखील वेगळाच अनुभव यायला मिळतो. ‘अल हुतैब’ हे समुद्रसपाटीपासून तब्बल 3,200 मीटर उंचीवर वसलेले आहे. या गावाच्या विशेष भौगोलिक स्थितीमुळेच इथे कधीही पाऊस पडत नाही. ढग तयार होण्याची प्रक्रिया गावाच्या खालीच होत असल्याने तेथेच पाऊस पडतो, मात्र अल हुतैबमध्ये तो पोहोचतच नाही.

खरे तर, हे गाव एका विलक्षण हवामानात वसलेले आहे. येथील लोकांना दिवसाढवळ्या असह्य उन्हाचा सामना करावा लागतो, तर रात्री गारठा प्रचंड जाणवतो. सूर्योदय होताच वातावरणात झपाट्याने बदल होतो आणि तापमानात मोठी वाढ होते. अशा उष्ण परिस्थितीतही येथे राहणारे स्थानिक रहिवासी आपल्या खास जीवनशैलीत याचा सहज सामना करतात.

संस्कृतीचा अनोखा संगम

‘अल हुतैब’ हे गाव केवळ हवामानामुळेच नव्हे, तर त्याच्या संस्कृतीमुळेही प्रसिद्ध आहे. येथे अल-बोहरा आणि अल-मुकरमा या मुस्लिम समाजाची मोठी वस्ती आहे. या समुदायाला ‘यमनी समुदाय’ असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे, या समाजाचे जुने संबंध भारताशीही आहेत. इतिहास लिहले आहे की, मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्या नेतृत्त्वाखालील इस्माइली पंथाचे अनुयायी मुंबईतही वास्तव्यास होते.

या गावाची आणखी एक खासियत म्हणजे येथील प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ. गावातील इमारती डोंगराच्या कड्यांवर अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत की त्या पाहणाऱ्यांना अचंबित करतात. पारंपरिक घरे आणि आधुनिक सोयीसुविधा यांचे उत्तम रूप येथे पाहायला मिळते. त्यामुळे अनेक पर्यटक या गावाला भेट देण्यासाठी आवर्जून जात असतात.