IT Refund: इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने 11 ऑक्टोबरपर्यंत करदात्यांना पाठवले 84,781 कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 11 ऑक्टोबरपर्यंत 59.51 लाखांहून अधिक करदात्यांना 84,781 कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंड साठी आहे. यातील वैयक्तिक इनकम टॅक्स रिफंड 22,214 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा टॅक्स रिफंड 62,567 कोटी रुपये होता.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ट्वीट करून म्हटले आहे की, “CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान 59.51 लाखांहून अधिक करदात्यांना 84,781 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. 57,83,032 प्रकरणांमध्ये 22,214 कोटी रुपयांचा आयकर रिफंड जारी करण्यात आला आहे आणि 1,67,718 प्रकरणांमध्ये 62,567 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये  इनकम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जारी 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडपेक्षा हे 43.2 टक्के जास्त आहे.

नवीन पोर्टलवर दोन कोटीहून अधिक ITR दाखल केले

त्याच वेळी, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने गुरुवारी सांगितले की 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत दोन कोटींहून अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत आणि नवीन आयटी पोर्टलच्या कामगिरीशी संबंधित समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. CBDT करदात्यांना 2020-21 (एप्रिल 2020-मार्च 2021) या आर्थिक वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न लवकरात लवकर भरण्याचे आवाहन करते, असे सांगून की सर्व ITR ई-फाइलिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Comment