औरंगाबाद | आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास 10 वी चा निकाल लागला. यामुळे दहावीच्या मुलींमुलांचे एकदाचे टेंशन मिटले आहे. यातच निकाल लागताच आजपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयला प्रवेश घेता येणार आहे. यंदा 1148 मुले तर 184 मुलींच्या जागा भरल्या जाणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना आयटीआयसाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहेत. यंदा शहरातील शासकीय आयटीआय मुलांच्या महाविद्यालयात एकूण 1 हजार 148 जागा भरण्यात येणार असून मुलींच्या महाविद्यालयात 184 जागा भरण्यात येणार आहे.
दरवर्षी आयटीआय क्षेत्राकडे दहावीच्या मुला-मुलींचा कल सर्वात जास्त असतो. यंदाही आयटीआय अभ्यासक्रमाला गती मिळेल अशी आशा आहे. कोरोना मुले यंदाही ऑनलाइन पद्धतीने ऍडमिशन होणार आहेत.