ऐकावे ते नवलच ! उंदरांच्या शिकारीसाठी मांजराचे अपहरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मोकाट फिरणाऱ्या मांजरीना धरून त्याचे मास खात असल्याचा संशय आल्याने नागरिकांनि मांजर घेऊन जात असलेल्या दोन परप्रांतीय तरुणांना पकडून मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी मुकुंदवाडी रामनगर भागात घडली. करुणाकर शामसन गंटा (19) आणि लोकेश शिवय्या कटा (19, दोघे रा. मूळ गाव शंकरपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा, ह.मु. इंदेवाडी झोपडपट्टी, जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मुकुंदवाडी परिसरात मांजरींना मटणाचे तुकडे टाकून गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू होता. मटणाच्या आशेने आलेले मांजर गळाने पकडून पिशवीत टाकण्यात येत होते. दुचाकीवरून (टीएस 07 एचएस 6298) दोघे परिसरात फिरत होते तेव्हा अमोल चव्हाण यांनी मांजरी पकडत असल्याची माहिती प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेचे सदस्य श्रीनिवास नंदलाल धुप्पड यांना दिली. धुप्पड यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळांतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दुचाकीवरून मांजरी शोधत असलेल्या दोघांना चव्हाण व धुप्पड यांनी गाठले. विचारपूस करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडले.

या दोघांना नागरिकांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पकडून आणले. त्याठिकाणी धुप्पड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोघांच्या ताब्यातील मांजर जप्त करत सोडून देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.

Leave a Comment